IND vs SA 2nd Test | आफ्रिकेविरूद्ध ना कपिल देव, ना कुंबळे ना सिराज, कोणालाच जमला नाही असा ‘या’ बॉलरने रचलाय वर्ल्ड रेकॉर्ड

IND vs SA2nd Test : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटीमध्ये सिराज याने सहा विकेट घेत धुरळा उडवून टाकला. पण टीममधील दुसऱ्या एका बॉलरनेही रचला एक खास रेकॉर्ड, जो याआधी कोणालाही जमला नाही.

IND vs SA 2nd Test | आफ्रिकेविरूद्ध ना कपिल देव, ना कुंबळे ना सिराज, कोणालाच जमला नाही असा 'या' बॉलरने रचलाय वर्ल्ड रेकॉर्ड
Team india Image Credit source: icc
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 6:57 PM

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या टीम इंडियाने दमदार सुरूवात केली आहे. टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतलेल्या आफ्रिकेला अवघ्या 55 धावांवर गुंडाळलं आहे. मोहम्मद सिराज याने परत एकदा एकट्याच्या दमावर सामना काढून दाखवला. सिराजच्या गोलंदाजीसमोर आफ्रिकन फलंदाज नतमस्तक झालेले पाहायला मिळाले. त्यासोबतच मुकेश कुमार यानेही शेवटी येत अवघे 2 ओव्हर दोन बॉल टाकत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

बिहारचा लाल ठरला कसोटीमधील तिसरा गोलंदाज

मुकेश कुमार याने दोन विकेट घेतल्या, यामध्ये केशव महाराज आणि कगिसो रबाडा यांना त्याने आऊट करत मोठा कारनामा आपल्या नावावर केला आहे. मुकेश कुमार याने दोन विकेट घेतल्या पण गड्याने एकही रन दिला नाही. एकही रन न देता विकेट घेणार मुकेश कुमार हा कसोटी क्रिकेटमधील तिसरा गोलंदाज ठरला आहे.

मुकेश कुमारच्या आधी 1959 मध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू रिची बेनॉड यांनी एकही धाव न देता तीन विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर 2021 साली जो रूट यानेही एकही धाव न देता दोन विकेट घेतल्या होत्या. आता मुकेश कुमार याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मुकेश कुमार याला पहिल्या सामन्यात संधी मिळली नव्हती, त्यानंतर आता सुरू असलेल्या कसोटीमध्ये त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.