फलंदाजांचा कर्दनकाळ, तर गोलंदाज विकेट्सने मालामाल, कशा आहेत द. आफ्रिकेतल्या खेळपट्ट्या?
तिथल्या विकेटवर खेळणं सोपं नाही, कसोटी क्रिकेट तर त्याहून अवघड, होय, हेच दक्षिण आफ्रिकेतलं वास्तव आहे, जिथे टीम इंडिया सध्या उपस्थित आहे. तिथली विकेट इतकी वेगळी आहे की, टीम इंडिया आतापर्यंत कधीच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही.
तिथल्या विकेटवर खेळणं सोपं नाही, कसोटी क्रिकेट तर त्याहून अवघड, होय, हेच दक्षिण आफ्रिकेतलं वास्तव आहे, जिथे टीम इंडिया सध्या उपस्थित आहे. तिथली विकेट इतकी वेगळी आहे की, टीम इंडिया आतापर्यंत कधीच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही. भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याच्या इच्छेने तिथल्या खेळपट्ट्यांवर उतरणार आहे. इतिहासाची पाने उलटली पाहिजेत, पण, दक्षिण आफ्रिकेच्या विकेट्सवर हे काम सोपे नाही. तिथे गोलंदाजी करणे जितके सोपे दिसते. फलंदाजी तितकीच अवघड आहे. आणि, या नुसत्या चहाच्या टपरीवरच्या चर्चा नाहीत, तर त्यामागे गेल्या 3 वर्षांचं रिपोर्ट कार्ड आहे. तिथल्या विकेट्सशी संबंधित आकडे धक्कादायक आहेत. (IND vs SA: South Africa has toughest cricket pitch batting and easy to Bowl)
2018 च्या सुरुवातीपासून दक्षिण आफ्रिकेची विकेट ही फलंदाजीसाठी जगातील सर्वात कठीण विकेट्सपैकी एक आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेची फलंदाजीची सरासरी 25.39 राहिली आहे. यापेक्षा कमी फलंदाजीची सरासरी या काळात फक्त वेस्ट इंडिजच्या खेळपट्ट्यांवरच दिसली आहे. या प्रकरणात, भारतीय खेळपट्ट्या 5 व्या क्रमांकावर आहेत, जिथे सरासरी 26.68 आहे. तर इंग्लंड 26.45 च्या सरासरीने चौथ्या क्रमांकावर आहे. ज्यामध्ये आयर्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दक्षिण आफ्रिकेची विकेट फलंदाजांसाठी कठीण
शतकांबद्दल बोलायचे झाल्यास, 2018 पासून दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या 18 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 15 शतके झळकावली गेली आहेत. म्हणजेच हे प्रमाण प्रति कसोटी 0.83 शतक असे आहे, जे सर्वात कमी आहे. वेस्ट इंडिजमध्येही हे प्रमाण 1 आहे, जिथे या कालावधीत खेळल्या गेलेल्या 16 कसोटींमध्ये 16 शतके झळकावली गेली आहेत. तर भारतात 16 कसोटीत 24 शतके, इंग्लंडमध्ये 26 कसोटीत 30 शतके आणि ऑस्ट्रेलियात 18 कसोटीत 28 शतके झळकावली आहेत.
गोलंदाजांसाठी अप्रतिम विकेट
दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी जितकी अवघड तितकीच गोलंदाजी सोपी दिसते. म्हणजेच आफ्रिकन खेळपट्ट्या गोलंदाजांसाठी स्वर्गीय आहेत. दक्षिण आफ्रिकेत गोलंदाजांना गोलंदाजीचा आनंद मिळतो. आणि आम्ही ही गोष्ट अलीकडील डेटाच्या आधारे सांगत आहोत. 2018 पासून आतापर्यंत, दक्षिण आफ्रिकेतील गोलंदाजांचा स्ट्राइक रेट 49.5 प्रति विकेट इतका आहे, जो इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर, गोलंदाजांसाठी सोपी विकेट या काळात वेस्ट इंडिजची आहे, जिथे स्ट्राइक रेट 52.0 आहे. त्याच वेळी, भारत या बाबतीत 52.4 च्या स्ट्राइक रेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मात्र, या काळात दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर धावांचा वेग सर्वाधिक राहिला आहे, ही बाब फलंदाजांसाठी काहीसा दिलासा देणारी आहे. तिथली इकॉनमी 3.20 इतका आहे. या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथला इकॉनमी 3.14 असा आहे.
इतर बातम्या
टीम इंडियात आला नवा ‘सिक्सर किंग’, 2021 मध्ये षटकारांची बरसात, रोहित शर्मालाही टाकलं मागे
’83’ चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी होतं – रवी शास्त्री
Harbhajan Singh: ‘मी मनातून आधीच…’ निवृत्तीच्यावेळी हे काय म्हणाला हरभजन
(IND vs SA: South Africa has toughest cricket pitch batting and easy to Bowl)