Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक यशस्वी आणि कसोटी विकेट घेणारे भारतीय गोलंदाज, पाहा संपूर्ण यादी…

भारताचा संघ (Team India) दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर आहे. यावेळी तो कसोटी मालिका (Test Cricket)जिंकून येतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय गोलंदाज(Indian Bowlers)ही त्या ताकदीचे आहेत. इथे त्यांची लिस्ट (List) देत आहोत.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक यशस्वी आणि कसोटी विकेट घेणारे भारतीय गोलंदाज, पाहा संपूर्ण यादी...
भारतीय गोलंदाज
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 11:20 AM

मुंबई : भारताचा संघ (Team India) दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर आहे. यावेळी तो कसोटी मालिका (Test Cricket) जिंकून येतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय गोलंदाज(Indian Bowlers)ही त्या ताकदीचे आहेत. मात्र, सध्याच्या ताकदीचे गोलंदाज आणि याआधी सर्वोत्तम कामगिरी केलेले गोलंदाज यांचा आढावा घेणंही गरजेचं आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक विकेट घेणार्‍या भारतीय गोलंदाजांवर एक नजर टाकूया आणि जाणून घेऊयात कोण अव्वल आहे आणि सध्याच्या संघातील कोणता गोलंदाज त्यात सामील आहे ते…

अनिल कुंबळे दक्षिण आफ्रिकेत सर्वात यशस्वी गोलंदाजाचा किताब भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्यानं 1992 ते 2007दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकूण 12 सामने खेळले आणि 32.02च्या सरासरीने 45 बळी घेतले.

जवागल श्रीनाथ कर्नाटकचे गोलंदाज दक्षिण आफ्रिकेत बोलताना दिसत आहेत. त्यामुळे अनिल कुंबळेनंतर सर्वाधिक विकेट घेणारा जवागल श्रीनाथ आहे. या वेगवान गोलंदाजानं 1992 ते 2001दरम्यान खेळल्या गेलेल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये 25.27च्या सरासरीनं 43 बळी घेतले आहेत. यादरम्यान त्यानं 3 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.

झहीर खान भारतीय क्रिकेटमध्ये श्रीरामपूर एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला झहीर खान दक्षिण आफ्रिकेतला तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. 2001 ते 2013 दरम्यान खेळल्या गेलेल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 35.60च्या सरासरीनं 30 बळी घेतले आहेत.

एस. श्रीशांत दक्षिण आफ्रिका आणि केरळ एक्स्प्रेसबद्दल बोलायचे झाल्यास शांताकुमारन श्रीशांतचं नाव नाही, असं होणार नाही. श्रीशांतच्या दक्षिण आफ्रिकेशी संबंधित अनेक आठवणी आहेत. तसेच तो आफ्रिकेतला चौथा सर्वात यशस्वी भारतीय कसोटी गोलंदाज आहे. 2006 ते 2011दरम्यान खेळल्या गेलेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 28.55च्या सरासरीनं 27 बळी घेतले आहेत.

मोहम्मद शमी मोहम्मद शमीनं 2013 ते 2018 दरम्यान खेळल्या गेलेल्या 5 कसोटी सामन्यांमध्ये 21 बळी घेतले आहेत, ज्यामध्ये एकदा 5 बळी घेण्याचा पराक्रमही त्याच्या नावावर आहे.

इशांत शर्मा आफ्रिकेच्या भूमीवर खळबळ उडवून देण्यात शमी नक्कीच पुढं आहे. पण इशांत शर्माही मागं नाही. तिथला तो सहावा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज आहे. इशांतनं 2010 ते 2018दरम्यान खेळल्या गेलेल्या 7 कसोटीत 20 बळी घेतले आहेत.

Fab 4 Cricket : सचिन तेंडुलकरच्या ‘तुझे फॅब 4 कोण?’, या प्रश्नावर विनोद कांबळीचं भन्नाट उत्तर!

83 Movie Review | कठोर परिश्रम, घाम अन् रक्तही गाळले, तेव्हा भारताला मिळाला 1983चा विश्वचषक!

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : खरेदी केंद्रावर तूर विक्रीपूर्वी करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.