IND vs SA T 20 Match: पहिल्या 10 ओव्हर्समध्ये भारताची जबरदस्त सुरुवात, इशानची हाफ सेंच्युरी VIDEO
IND vs SA T 20 Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात पहिला T 20 सामना सुरु आहे. आजपासून 5 T20 सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळला जात आहे.
नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात पहिला T 20 सामना सुरु आहे. आजपासून 5 T20 सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बावुमाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हा निर्णय योग्य ठरवता आला नाही. इशान किशन (Ishan Kishan) आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सलामी दिली. पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात भारताने बिनबाद 51 धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात पर्नेलने दक्षिण आफ्रिकेला पहिलं यश मिळवून दिलं. ओव्हरच्या सुरुवातीलाच गायकवाडने षटकार ठोकला होता. पण दुसऱा चेंडू कव्हर्सला मारण्याच्या प्रयत्नात त्याने मिडविकेटला बावुमाकडे सोपा झेल दिला. ऋतुराज गायकवाडने 15 चेंडूत 23 धावा केल्या. यात 3 षटकार होते. पहिल्या 10 षटकात भारताच्या 1 बाद 102 धावा झाल्या आहेत.
इशान किशनने केशव महाराजला मारलेले कडक SIX पहा
इशानने आफ्रिकेच्या गोलंदाजांना कसं चोपलं, त्याची संपूर्ण इनिंग इथे क्लिक करुन VIDEO पहा
इशानची हाफ सेंच्युरी
डावुखऱ्या इशान किशनने हाफ सेंच्युरी झळकावली आहे. तिसऱ्या क्रमांकावर आलेला श्रेयस अय्यर 24 धावंवर खेळतोय. श्रेयसने आक्रमक सुरुवात केली आहे. त्याने 3 षटकार ठोकलते. पावरप्लेच्या सहाव्या आणि 10 व्या ओव्हरमध्ये भारताने प्रत्येकी 15 धावा लुटल्या. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामला कोविडची बाधा झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेसाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली होती.
FIFTY! A well made half-century by @ishankishan51 off 37 deliveries.
His 3rd in T20Is.
Live – https://t.co/YOoyTQmu1p #INDvSA @Paytm pic.twitter.com/RdQxXQslAq
— BCCI (@BCCI) June 9, 2022
वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी
मात्र, सामना सुरू होण्यापूर्वीच राहुल दुखापतीमुळे पाचही सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि निवड समितीनं ऋषभ पंतची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. हार्दिक पंड्या उपकर्णधार आहे. भारताला आज जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. कारण भारताने टी 20 मध्ये सलग 12 सामने जिंकले आहेत. आज 13 वा सामना जिंकण्याची संधी आहे. भारताला आम्ही टी 20 मध्ये विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड करुन देणार नाही, असं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने आधीच म्हटलय.