Rishabh Pant: ‘ऋषभ पंत जाडा झालाय, त्याला वाकताही येत नाही’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची टीका

सध्या ऋषभ पंतचा (Rishabh Pant) फॉर्म हरवला असून त्याच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. आयपीएल 2022 नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतही पंत फ्लॉप आहे.

Rishabh Pant: 'ऋषभ पंत जाडा झालाय, त्याला वाकताही येत नाही', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची टीका
rishabh-pant
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 8:25 PM

मुंबई: सध्या ऋषभ पंतचा (Rishabh Pant) फॉर्म हरवला असून त्याच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. आयपीएल 2022 नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतही पंत फ्लॉप आहे. त्याने या सीरीजमध्ये 29,5,6 आणि 17 धावा केल्या आहेत. केएल राहुल (KL Rahul) दुखापतग्रस्त झाल्यामुळे ऋषभ पंतला कॅप्टनशिपची संधी मिळाली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ या मालिकेत 2-2 असा बरोबरीत आहे. ऋषभ पंतने लवकर त्याच्या लौकीकाला साजेसा खेळ केला नाही, तर त्याच्यावरही बेंचवर बसण्याची वेळ येऊ शकते. सध्या भारतीय संघात आपल स्थान पक्क करण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. अनेक युवा खेळाडू प्रतिक्षेत आहेत. अशावेळी पंतला गाफील राहून चालणार नाही. पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने (Danish Kaneria) ऋषभ पंतच्या फिटनेसवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ऋषभ पंतच वजन भरपूर वाढलं आहे. विकेटकीपिंग करताना तो वेगवान गोलंदाजांसमोर नीट वाकूही शकत नाही, असं दानिश कनेरियाने म्हटलं आहे.

प्रत्येकवेळी असा OUT होतोय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सीरीजमध्ये ऋषभ पंत सतत ऑफ स्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूवर आऊट होतोय. पाहुणा संघ देखील ऋषभ पंतच्या या कमजोरीचा फायदा उचलतोय. पाकिस्तानी गोलंदाज दानिश कनेरियाने ऋषभ पंतच्या फिटनेस आणि विकेटकीपिंगवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

जेव्हा वेगवान गोलंदाज येतो, तेव्हा….

“मी ऋषभ पंतच्या विकेटकीपिंगबद्दल बोलेन. मला एक गोष्ट जाणवलीय. जेव्हा वेगवान गोलंदाज येतो. त्यावेळी ऋषभ पंत जास्त वाकू शकत नाही. त्याच वजन खूप वाढलय अस वाटतं” असं कनेरिया आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला.

त्याला बाकीच्यांनी साथ दिली

“या सगळ्या गोष्टींमुळे ऋषभ पंतच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण होतेय. तो पूर्णपणे फिट आहे का? त्याच्या कॅप्टनशिपबद्दल बोलायच झाल्यास, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक आणि अन्य फलंदाज, गोलंदाजांनी त्याला साथ दिली” असं कनेरिया म्हणाला. ऋषभ पंतकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज जिंकणारा पहिला कॅप्टन बनण्याची संधी आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.