IND vs SA T20 Series: ‘भारताला वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यापासून रोखणार’, दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल

IND vs SA T20 Series: इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम संपला असून आता लवकरच भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांना सुरुवात होणार आहे.

IND vs SA T20 Series: 'भारताला वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यापासून रोखणार', दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल
South African Team Arrives in IndiaImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 10:06 AM

IND vs SA T20 Series: इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम संपला असून आता लवकरच भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांना सुरुवात होणार आहे. पुढच्या आठवड्यापासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (India vs South Africa) पाच T 20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. येत्या 9 जून पासून भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये टी 20 सामन्यांची मालिका सुरु होईल. 19 जूनपर्यंत ही मालिका चालणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत दाखल झाला. क्विंटन डि कॉक, डेविड मिलर (David Miller) आणि कागिसो रबाडा हे खेळाडू आधीपासूनच भारतात आहेत. ट्रिस्टन स्टब्बस हा या संघातील नवीन चेहरा आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे ट्रिस्टन स्टब्ब्सला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे.

मुंबई इंडियन्सचा खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या संघात

ट्रिस्टन स्टब्ब्स पहिल्यांदा भारतात आलेला नाही. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्याला दोन सामन्यात संधी मिळाली. पण तो छाप उमटवू शकला नाही. शुन्य आणि 2 अशा धावा त्याने केल्या. आता भारताविरुद्ध होणाऱ्या टी 20 सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

भारताला वर्ल्ड रेकॉर्डची संधी

भारताला वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यापासून रोखण्याचं दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान असेल. टी 20 वर्ल्ड कप नंतर भारतीय संघाने आतापर्यंत सलग 12 टी 20 सामने जिंकले आहेत. आता 13 वा सामना जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याची के एल राहुलच्या संघाकडे संधी आहे.

कॅप्टन टेंबा बावुमा काय म्हणाला?

“यावर्षी T 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्या तयारीच्या दृष्टीने भारताविरुद्धची मालिका एक चांगली संधी आहे. आम्ही जिंकण्याचा आणि टी 20 मध्ये सर्वाधिक विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यापासून भारताला रोखण्याचा प्रयत्न करु” असं टेंबा बावुमा म्हणाला.

असा आहे भारताचा टी-20 संघ

केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक

असा आहे दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ

टेंबा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, रीझा हेंड्रीक्स, हीनरीच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी निगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, डे्वयन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शमसी, ट्रिस्ट स्टब्बस, रासी वॅन डर डुसें, मार्को जॅनसेन,

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.