29 धावात पाच विकेट, कार्तिक-पंतने 5 धावा पण नाही केल्या, दक्षिण आफ्रिकेला भिडण्याआधी वायजॅगमध्ये टीम इंडियाचा पराभव

टीम इंडिया (Team India) सध्या विशाखापट्टनम (vizag) येथे आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी 20 सामना (IND vs SA 3 rd T 20) आहे. भारतीय संघासाठी हा सामना 'करो या मरो' आहे.

29 धावात पाच विकेट, कार्तिक-पंतने 5 धावा पण नाही केल्या, दक्षिण आफ्रिकेला भिडण्याआधी वायजॅगमध्ये टीम इंडियाचा पराभव
Dinesh Karthik-Rishabh Pant Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 11:57 AM

मुंबई: टीम इंडिया (Team India) सध्या विशाखापट्टनम (vizag) येथे आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी 20 सामना (IND vs SA 3 rd T 20) आहे. भारतीय संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ आहे. कारण पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. आजची मॅचही ते जिंकले, तर मालिकेत विजयी आघाडी घेतील. त्यामुळे काहीही करुन भारताला आजचा सामना जिंकावाच लागेल. याआधी वायजॅग मध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाला अनुकूल निकाल लागला नव्हता. भारताचा पराभव झाला होता. याआधी विशाखापट्टनम मध्ये खेळल्या गेलेल्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाला होता. हा सामना तीन वर्षांपूर्वी 2019 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. ऑस्ट्रेलियाने 3 विकेटने भारताला नमवलं होतं. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील आज तिसरा सामना आहे. या स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा सामना आहे.

2019 च्या सामन्यात काय झालं होतं?

सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खराब कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाला विशाखापट्टनममध्येही चांगली कामगिरी करता आली नव्हती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2019 मध्ये ते इथे शेवटचा टी 20 सामना खेळले होते. खूप कमी धावसंख्या त्या सामन्यात झाली होती. भारताचा 3 विकेटने पराभव झाला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 126 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं होतं.

सध्याच्या संघातील फक्त दोन खेळाडू त्या टीममध्ये होते

वायजॅगमधील मागच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अत्यंत सुमार कामगिरी केली होती. फक्त 29 धावात पाच विकेट गेल्या होत्या. 80 ते 109 धावांदरम्यान 10 ते 17 ओव्हर्समध्ये या विकेट गेल्या होत्या. सध्याच्या संघातील ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकच त्या टीममध्ये होते. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक दोघांनी पाच धावाही स्कोर बोर्डवर लावल्या नव्हत्या. पंतने फक्त 3 धावा आणि कार्तिकने 1 रन्स केला होता.

हे सुद्धा वाचा

श्रीलंकेची टीम 82 रन्समध्ये ऑलआऊट

याआधी 2016 मध्ये भारतीय संघ वायजॅगमध्ये टी 20 सामना खेळला होता. तो सुद्धा लो स्कोरिंग सामना होता. श्रीलंकेचा संघ 82 धावात ऑलआऊट झाला होता. भारताने 9 विकेटने सामना जिंकला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.