IND vs SA | भारतावर शानदार विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टनशिपबद्दल एक मोठा निर्णय
IND vs SA Test | दक्षिण आफ्रिकेने भारताला पहिल्या कसोटी सामन्यात हरवल्यानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सध्या दक्षिण आफ्रिका फॉर्ममध्ये आहे. त्यांनी तीन दिवसात पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल लावला.
IND vs SA Test | दक्षिण आफ्रिकेने सीरीजमधील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर दणदणीत विजय मिळवला. सेंच्युरियन कसोटी दक्षिण आफ्रिकेने अवघ्या तीन दिवसात जिंकली. या कसोटी सामन्यात टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन होता. पण कसोटीच्या पहिल्याच दिवशी दुखापतीमुळे त्याला मैदान सोडाव लागलं. त्यानंतर डीन एल्गरने नेतृत्व संभाळल व टीमला विजयाच्या दिशेने घेऊन गेला. आता बातमी अशी आहे की, दुसऱ्या कसोटीत डीन एल्गरचा दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन राहिलं. कारण टेम्बा बावुमा टेस्ट सीरीजमधील उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाहीय.
दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. आता या सीरीजमधील एकमेव कसोटी सामना बाकी आहे. दोन्ही टीममध्ये शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारी 2024 पासून केप टाऊनमध्ये खेळला जाणार आहे. या कसोटीत एल्गरच दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन असेल. आता प्रश्न हा आहे की, बावुमा बाहेर होण्यामागच कारण काय?
टेंबा बावुमा बरोबर नेमक काय घडलं?
टेंबा बावुमाला सेंच्युरियन कसोटीत दुखापत झाली. त्यामुळे तो टेस्ट सीरीजमधून बाहेर गेलाय. फिल्डिंग करताना त्याला ही दुखापत झाली होती. ही हॅमस्ट्रिंगची दुखापत आहे. इंजरीनंतर त्याची स्कॅनिंग करण्यात आली. दुखापत थोडी गंभीर आहे. त्यामुळे भारताविरुद्ध दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीय.
सनरायजर्स हैदराबादकडून खेळणार का?
दुखापतीमुळे टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेत T20 लीगमध्ये खेळणार का? या बद्दलही सस्पेंस आहे. तो या लीगमध्ये सनरायजर्स हैदराबादचा भाग आहे. टुर्नामेंटच्या आधी त्याची मेडीकल तपासणी होईल, त्यावर तो या लीगमध्ये खेळणार की नाही? याचा निर्णय होईल.