IND vs SA: ‘त्यापासून पळणार नाही’, पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया
अर्थात दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात भारतापेक्षा सरस कामगिरी केली. त्यामुळे कसोटीसह मालिका त्यांनी जिंकली.
केपटाऊन: तीन कसोटी सामन्यांची मालिका दक्षिण आफ्रिकेने 2-1अशी जिंकली. केपटाऊनमध्ये (Capetown test) दुसऱ्याडावात सरस खेळ करणारा संघ मालिका विजयाचा प्रबळ दावेदार होता. अर्थात दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात भारतापेक्षा सरस कामगिरी केली. त्यामुळे कसोटीसह मालिका त्यांनी जिंकली. “पाहण्याच्या दृष्टीने हा खूप सुंदर कसोटी सामना होता. पहिली कसोटी आम्ही जिंकली पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने चांगला खेळ केला. महत्त्वाच्या क्षणी त्यांनी चांगली गोलंदाजी केली. ते विजयासाठी पात्र होते” असे विराट कोहलीने (Virat kohli) म्हटले आहे.
“संधी मिळते तेव्हा त्याचा फायदा करुन घेता आला पाहिजे. परदेश दौऱ्यात आमच्यासमोर हे एक आव्हान आहे. जेव्हा आम्ही त्या संधीचा फायदा उचललाय तेव्हा आम्ही जिंकलो आहोत” असे कोहली म्हणाला.
“लोक वेग आणि बाऊन्सबद्दल बोलतात. त्यांच्या हाईटचा विचार केल्यास त्यांना तिन्ही कसोटी सामन्यात खेळपट्टीकडून बरीच मदत मिळत होती. चूका करण्यासाठी त्यांनी आमच्यावर दबाव टाकला. त्यांना इथल्या परिस्थितीची, वातावरणाची बऱ्यापैकी माहिती होती. आम्हाला आमची फलंदाजी पाहावी लागेल. त्यापासून पळणार नाही. आमची फलंदाजी ढेपाळली आणि ती चांगली गोष्ट नाही” असे विराट म्हणाला.