IND VS SA: विराटने बसमधून उतरुन सांगितलं, फोटो नका काढू, विमानतळावर नेमकं काय घडलं?

बीसीसीआयशी पंगा घेणाऱ्या कोहलीला ही पराभवाची मालिका खंडीत करण्याची संधी चालून आली आहे. आपल्या शब्द बाणांनी घायाळ करणाऱ्या कोहलीसमोर आता चांगली कामगिरी करुन दाखवण्याचं आव्हान आहे.

IND VS SA: विराटने बसमधून उतरुन सांगितलं, फोटो नका काढू, विमानतळावर नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 3:26 PM

मुंबई: वादाची राळ उडवून देणाऱ्या पत्रकार परिषदेनंतर कॅप्टन विराट कोहली (Virat kohli) आज १८ सदस्यीय संघासह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना (South Africa tour) झाला. या दौऱ्यात विराट बरोबर त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा (Anushka sharma) आणि मुलगी वामिकाही (Vamika) सोबत आहे. येत्या २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होत आहे. भारत या दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा दौरा अनेक अर्थांनी विराट कोहलीसाठी मोठा आहे. कारण आतापर्यंत कुठलाही भारतीय कर्णधार दक्षिण आफ्रिकेत मालिका विजय मिळवू शकलेला नाही. थेट बीसीसीआयशी पंगा घेणाऱ्या कोहलीला ही पराभवाची मालिका खंडीत करण्याची संधी चालून आली आहे. आपल्या शब्द बाणांनी घायाळ करणाऱ्या कोहलीसमोर आता चांगली कामगिरी करुन दाखवण्याचं आव्हान आहे. कोहलीच्या हाती आता फक्त कसोटी संघाचे कर्णधारपद असून त्याच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. दरम्यान आज दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होत असताना, कोहली फोटोग्राफर्सना फोटो काढू नका, असं सांगत होता.

विमानतळावर असं नेमकं काय घडलं? विमानतळावर असं नेमकं काय घडलं की, विराटला फोटोग्राफर्सना फोटो काढू नका असं सांगावं लागलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विमानतळावर अन्य सदस्यांसह विराट आणि अनुष्का बसमध्ये जाऊन बसले. त्यानंतर विराट बसमधून उतरला व त्याने फोटोग्राफर्सना बेबीचे फोटो काढू नका, असे सांगितले. बेबी म्हणजे विराटची एक वर्षाची मुलगी वामिका. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाताना अनुष्काने काळ्या रंगाचा ट्रॅकसूट घातला होता.

टीम इंडियाच्या परदेश दौऱ्याच्यावेळी अनुष्का आणि वामिकाही विराटसोबत दौऱ्यावर जातात. जुलैमध्ये ते विराट सोबत युके दौऱ्यावर गेले होते. तिथे भारतीय संघ दोन स्पर्धांमध्ये खेळला. अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटो शेअर केले होते. विराट-अनुष्काने वामिका सहा महिन्यांची झाली, तो बर्थ डे लंडनमध्ये साजरा केला होता.

संबंधित बातम्या: ‘विराट आधी देशाचा विचार करं’, बोर्डाशी पंगा घेणाऱ्या कॅप्टनला मोठ्या क्रिकेटपटूचा मोलाचा सल्ला Ashes 2021: हवेत झेपावून बटलरची सुपरमॅन कॅच, हा VIDEO नक्की पाहा कॉमेट्री बॉक्समध्ये ईशा गुहाच्या डबल मीनिंग गुगलीवर गिलख्रिस्ट क्लीन बोल्ड

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.