IND vs SL, 1st T20I : 1 जागेसाठी 3 तगडे दावेदार, हार्दिक कुणाला संधी देणार?

हार्दिक पंड्यासमोर (Hardik Pandya) पहिल्याच सामन्यात मोठा पेच आहे. विकेटकीपर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing Eleven) तिघांपैकी कुणा एकाला संधी द्यायची असा प्रश्न पंड्यासमोर आहे.

IND vs SL, 1st T20I : 1 जागेसाठी 3 तगडे दावेदार, हार्दिक कुणाला संधी देणार?
Image Credit source: Hardik Pandya Twitter
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 11:14 PM

मुंबई : श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया (SL vs IND) यांच्यात 3 जानेवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) टी 20 मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी ही हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) आहे. मात्र हार्दिकसमोर पहिल्याच सामन्यात मोठा पेच आहे. विकेटकीपर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing Eleven) तिघांपैकी कुणा एकाला संधी द्यायची असा प्रश्न पंड्यासमोर आहे. (ind vs sl 1st t20 sanju samson ruturaj gaikwad or ishan kishan captain hardik pandya whom to get chance in played 11 against sri lanka)

टीम इंडियात श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात एकूण 3 विकेटकीपर आहेत. यामध्ये ईशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे 3 आघाडीचे विकेटकीपर आहेत. पण या तिघांपैकी विकेटकीपर म्हणून संधी एकालाच मिळणार. तिघेही सध्या जोरदार फॉर्मात आहेत. ईशानने नुकतंच वनडेत द्विशतक केलंय. ऋतुराजने एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्स मारण्याचा कारनामा केलाय. तर संजू सॅमसननेही उल्लेखनीय कामगिरी केली. तिघेही इन फॉर्म आहेत बॅटर विकेटकीपर आहेत. यामुळे आता तिघांपैकी हार्दिक कॅप्टन म्हणून कुणाला संधी देणार, हे अवघ्या काही तासातचं स्पष्ट होईल.

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.

हे सुद्धा वाचा

टी 20 आणि वनडे सीरिजसाठी टीम श्रीलंका

दसुन शनाका (कर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, कुशल मेंडिस (उपकर्णधार एकदिवसीय मालिका), भानुका राजपक्षे (फक्त टी 20 मालिकेसाठी), चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, वानिंदु हसारंगा (उपकर्णधार, टी 20 मालिका), आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे (फक्त एकदिवसीय मालिका), चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो (फक्त एकदिवसीय मालिका), दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन, लाहिरु कुमारा आणि नुवान तुशारा (फक्त टी 20 सीरिजसाठी).

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.