Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 1st Test: ‘तिची’ विराट बद्दलची भविष्यवाणी खरी ठरली, जसं भाकीत वर्तवलं तसंच मैदानात घडलं, shruti #100 ते टि्वट

IND vs SL 1st Test: विराट कोहली (Virat kohli) आज पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. चांगल्या सुरुवातीला तो शतकामध्ये बदलू शकला नाही.

IND vs SL 1st Test: 'तिची' विराट बद्दलची भविष्यवाणी खरी ठरली, जसं भाकीत वर्तवलं तसंच मैदानात घडलं, shruti #100 ते टि्वट
Image Credit source: bcci twitter
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 4:08 PM

IND vs SL 1st Test: कसोटी करीयरमधला 100 वा कसोटी सामना (Viat 100th test match) खेळणारा विराट कोहली (Virat kohli) आज पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. चांगल्या सुरुवातीला तो शतकामध्ये बदलू शकला नाही. चाहत्यांना आज विराटच्या 71 व्या शतकाची प्रतिक्षा होती. विराट आज शतक झळकावेल म्हणून चाहत्यांच्या टीव्हीकडे नजरा लागल्या होत्या. पण ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. विराटने चांगली सुरुवात केली होती. पण पुन्हा एकदा तो कमनशिबी ठरला. एमबुलडेनियाच्या (Embuldeniya) एक अप्रतिम वळणाऱ्या चेंडूने घात केला. विराटही आऊट झाल्यानंतर काही क्षणांसाठी क्रीझवर थांबला. त्यालाही विश्वास बसला नाही. विराट 45 धावांवर आऊट झाला. विराटने शेवटचं शतक 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यानंतर त्याने 70-80 धावा केल्या. पण तो अजून शतक झळकवू शकलेला नाही.

‘ते’ टि्वट होतय व्हायरल

विराट आऊट झाल्यानंतर एक टि्वट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतय. सामन्याच्या आदल्यारात्री एका टि्वटर युजरने विराटच्या बाद होण्याबद्दल भाकीत वर्तवलं होतं. कोहली किती धावा करणार, तो कसा आऊट होणार या बद्दल वर्तवलेले अंदाज तंतोतंत बरोबर ठरले.

मैदानावर तसंच घडलं

विराट कोहली त्याच्या 100 व्या कसोटीत 100 धावा करणार नाही. तो 45  (100) धावा करेल. त्याच्या खेळात चार कव्हर ड्राइव्हज असतील. एमबुलडेनिया त्याला आऊट करेल. बाद झाल्यानंतर मैदानावर धक्का लागल्यासारख्या विराटच्या रिअॅक्शन असतील, असं त्या टि्वटमध्ये म्हटलं होतं. आज मैदानावर विराट बाद झाल्यानंतर तसच चित्र दिसलं. त्यामुळे shruti #100 हे टि्वट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतय. विराटच्या बाबतीतली भविष्यवाणी खरी ठरल्यामुळे टि्वटर युजर्स आता shruti #100 आता दुसरे प्रश्न विचारत आहेत. विराटच्या बाबत केलेल्या टि्वटला आतापर्यंत 26.4 k लाइक्स मिळाले असून 7180 रिटि्वटस आहेत.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.