IND vs SL 1st Test: अनुष्का शर्माचं मैदानावर काय काम? सोशल मीडियावर घमासान, नेटीझन्स आपसातच भिडले
IND vs SL 1st Test: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी विराटला BCCI कडून सन्मानित करण्यात आलं. कसोटी क्रिकेटमध्ये सामन्यांच शतक पूर्ण करणारा विराट 12 वा भारतीय क्रिकेटपटू आहे.
नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) आज करीयरमधील 100 वा कसोटी सामना खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी विराटला BCCI कडून सन्मानित करण्यात आलं. कसोटी क्रिकेटमध्ये सामन्यांच शतक पूर्ण करणारा विराट 12 वा भारतीय क्रिकेटपटू आहे. सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर सर्वाधिक 200 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आहे. क्रिकेटच्या इतिहासात सचिनच सर्वाधिक कसोटी सामने खेळला आहे. आजच्या सामन्याआधी हेड कोच राहुल द्रविड यांनी संपूर्ण संघाच्या उपस्थितीत विराटला एक स्पेशल कॅप भेट म्हणून दिली. त्याला सन्मानित करताना त्याच्याबद्दल कौतुकाचे शब्द बोलले. करीयरमध्ये विराटने आतापर्यंत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे विराटसाठी आजचा दिवस खास आहे.
याला काही अर्थ आहे का?
विराटला आज सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्माही मैदानावर हजर होती. विराटच्या 100 व्या कसोटीचा आनंद अनुष्काच्या चेहऱ्यावर स्पष्टपण दिसत होता. खरंतर या सोहळ्यात अनुष्कानेच जास्त लक्ष वेधून घेतलं. विराट सोबत मैदानावर अनुष्काची उपस्थिती अनेकांना योग्य वाटली नाही. त्यावरुन नेटीझन्समध्येच दोन गट पडले आहेत. अनुष्काच्या उपस्थितीवरुन अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. याला काही अर्थ आहे का? असा अनेकांचा प्रश्न होत, तर विरुष्का जोडीचे समर्थक अनुष्काच्या उपस्थितीचे समर्थन करत होते.
Why Anushka Sharma is on the ground can someone please explain? pic.twitter.com/WR5zJ2H8IH
— ruchika naarang (@ZaftigRuchi) March 4, 2022
It was a big occasion for him so it’s normal to bring family out there
— Reader (@ReaderYyz) March 4, 2022
जे कोणी अनुष्काला ट्रोल करत आहेत, त्यांनी लक्षात घ्यावं ही एक परंपरा आहे. 100 व्या कसोटीच्यावेळी पत्नी मैदानावर उपस्थित असते, असं एका युजरने म्हटलं आहे.
Congratulations Kohli Saab @imVkohli pic.twitter.com/VxVrKWdfaq
— saanath ॐ (@sdbgrx) March 4, 2022
Anushka Sharma is the luckiest fan girl of Virat Kohli?❤️#100thTestForKingKohli #ViratKohli? pic.twitter.com/FPv4Ohjgfh
— ?????? (@Nara__Raakshasa) March 4, 2022
विराट काय म्हणाला? “मी बीसीसीआयचे आभार मानतो. माझ्या बालपणीच्या हिरोकडून आज मी 100 व्या कसोटीची कॅप घेतली. हे खूप सुंदर आहे” असं विराट म्हणाला. “हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. माझी पत्नी, माझा भाऊ, माझं कुटुंब इथे उपस्थित आहे. त्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. क्रिकेट हा एक टीम गेम आहे. तुमच्या सर्वांशिवाय हे शक्य नव्हतं. आयपीएल आणि तिन्ही फॉर्मेटमध्ये आम्ही जितक्या प्रमाणात क्रिकेट खेळतोय, ते पाहता पुढच्यापिढीने माझ्याकडून मी क्रिकेटच्या एका अस्सल फॉर्मेटमध्ये 100 सामने खेळलो ही प्रेरणा घ्यावी, असं विराटने सांगितलं.