IND vs SL 2nd T20: टीम इंडियाला जाडेजाच्या जागी दावेदार सापडला, रेकॉर्ड मोडला, पुण्यात त्याचीच चर्चा

IND vs SL 2nd T20: टीम इंडियाला रवींद्र जाडेजाची जागा घेऊ शकेल, असा योग्य प्लेयर सापडलाय. त्यामुळे टीमला जाडेजाची उणीव जाणवणार नाही.

IND vs SL 2nd T20: टीम इंडियाला जाडेजाच्या जागी दावेदार सापडला,  रेकॉर्ड मोडला, पुण्यात त्याचीच चर्चा
Ravindra jadeja Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 8:51 AM

पुणे: भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा मागच्या काही काळापासून अनफिट आहे. त्यामुळेच तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्याची जागा घेण्याची जबाबदारी अक्षर पटेलवर होती. रवींद्र जाडेजाप्रमाणे अक्षर पटेल डावखुरा फिरकी गोलंदाज असून लोअर ऑर्डरमध्ये स्फोटक बॅटिंग करतो. रवींद्र जाडेजाच्या जागी अक्षर यशस्वी होताना दिसतोय. पुण्यात श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या T20 सामन्यात हे दिसून आलं.

टीम इंडिया ही मॅच हरली, पण….

गुरुवारी पुण्यात श्रीलंकेविरुद्ध दुसरा T20 सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाचा श्रीलंकेने 16 धावांनी पराभव केला. टीम इंडिया ही मॅच हरली. पण अक्षर पटेलने आपली छाप उमटवली आहे. टीम इंडियाने 57 धावात 5 विकेट गमावल्या होत्या. पण धावांचा पाठलाग करताना 207 धावांच्या मोठ्या लक्ष्याच्या जवळपास पोहोचली.

3 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला

अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला बाहेर काढण्यासाठी अक्षर पटेलने श्रीलंकन गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने फक्त 20 चेंडूत अर्धशतक फटकावलं. त्याने तुफान बॅटिंग करताना रवींद्र जाडेजाचा 3 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला.

अक्षरची फटकेबाजी

अक्षर पटेल T20 इंटरनॅशनल मॅचमध्ये सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर येऊन अर्धशतक फटकावणारा पहिला फलंदाज बनलाय. अक्षरने फक्त 31 चेंडूत 6 सिक्स आणि 3 फोरच्या बळावर 65 धावा केल्या. रवींद्र जाडेजाने 2020 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 44 धावा केल्या होत्या. तो रेकॉर्ड त्याने मोडला. अक्षरची गोलंदाजीत कमाल

टीम इंडियासाठी आश्वासक बॅटिंग करण्याआधी त्याने गोलंदाजीत कमाल दाखवली. भारतीय स्पिनरने 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 24 धावा देऊन 2 महत्त्वाच्या विकेट काढल्या. या शानदार प्रदर्शनानंतरही अक्षर टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.