Suryakumar Yadav आणि डिविलियर्समध्ये जास्त Best कोण? शोएब अख्तरने दिलं उत्तर

Suryakumar Yadav ला मिस्टर 360 म्हटलं जातं. त्याच्या खेळामध्ये डिविलियर्सची झलक दिसते. आता शोएब अख्तरने दोघांमध्ये बेस्ट कोण? ते सांगितलय.

Suryakumar Yadav आणि डिविलियर्समध्ये जास्त Best कोण? शोएब अख्तरने दिलं उत्तर
Suryakumar yadav-Shoaib aktharImage Credit source: PTI/Twitter
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 1:21 PM

लाहोर: सूर्यकुमार यादव पुन्हा चर्चेत आलाय. त्याच कारण आहे, राजकोट T20 मध्ये त्याने झळकवलेलं तुफानी शतक. अवघ्या 45 चेंडूत सूर्याने सेंच्युरी ठोकली. सूर्यकुमार यादवच्या या खेळीने क्रिकेट विश्वातील अनेकांच मन जिंकलं. राजकोटमधील सूर्यकुमारची बॅटिंग पाहून प्रत्येकाने आपआपल्या परिने त्याचं कौतुक केलय. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही यामध्ये मागे नाहीय. त्याने 9 सिक्सनी सजलेली सूर्यकुमारची शतकी इनिंग पाहिली. सूर्यकुमार एबी डिविलियर्सपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचं शोएब अख्तरने म्हटलय.

शोएबने डिविलियर्सपेक्षा सूर्यकुमारला सर्वोत्तम का म्हटलं?

शोएब अख्तरने सूर्यकुमारला एबी डिविलियर्सपेक्षा सर्वोत्तम का ठरवलं? हा प्रश्न आहे. शोएबने त्याच्या युट्यूब चॅनलवर या प्रश्नाच उत्तर दिलय. सूर्यकुमार यादवच्या इनिंगच्या बळावर भारताने राजकोट T20I मध्ये श्रीलंकेला 91 धावांनी हरवलं. टीम इंडियाने ही सीरीज 2-1 अशी जिंकली.

‘एबीकडे स्वत:चा क्लास आहे, पण….’

टीम इंडियाने सीरीज जिंकल्यानंतर शोएब अख्तरने आपल्या युट्यूब चॅनलवर सूर्यकुमार यादवच गुणगान केलं. सूर्यकुमार एबी डिविलियर्सपेक्षा सर्वोत्तम असल्याचं सांगितलं. “एबीकडे स्वत:चा क्लास आहे. पण सूर्यकुमार बिनधास्त आहे. म्हणूनच तो 100 टक्के एबी डिविलियर्सपेक्षा वरचढ आहे” असं शोएब अख्तर म्हणाला. सूर्याच्या बॅटिंगने श्रीलंकेचा टॉप प्लेयर पराभवाच दु:ख विसरला

शोएब अख्तरच नाही, सूर्यकुमार यादवने अन्य काही दिग्गजांच लक्षही वेधून घेतलय. श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंग आपल्या टीमच्या पराभवाच दु:ख विसरला. “सूर्यकुमार यादव पूर्णपणे एंटरटेनमेंट आहे. त्याची बॅटिंग पाहून मजा येते. त्याची बॅटिंग पाहून मन खुश होतं” असं मलिंगा म्हणाला. सहकारी खेळाडूंनी सुद्धा सूर्यकुमार यादवच कौतुक केलं. केएल राहुल आणि विराट कोहलीने इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपली प्रतिक्रिया दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.