Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: श्रेयस अय्यर-जाडेजाने लंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं, लिहिली भारताच्या विजयाची स्क्रिप्ट

धर्मशाळा येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (India vs Srilanka) शानदार विजय मिळवला.

IND vs SL: श्रेयस अय्यर-जाडेजाने लंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं, लिहिली भारताच्या विजयाची स्क्रिप्ट
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 10:52 PM

डेहराडून: धर्मशाळा येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (India vs Srilanka) शानदार विजय मिळवला. श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) भारताच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 58 धावांची विजयी भागीदारी केली. श्रेयसच्या 44 चेंडूत नाबाद 74 धावा आणि रवींद्र जाडेजाच्या 18 चेंडूत नाबाद 45 धावांच्या बळावर भारताने श्रीलंकेवर सात विकेट राखून विजय मिळवला. भारताने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता उद्या होणारा तिसरा सामना फक्त औपचारिकता मात्र आहे. श्रेयसने 74 धावांच्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार लगावले. रवींद्र जाडेजाने 18 चेंडूत नाबाद 45 धावा कुटल्या. या तुफानी खेळीत सात चौकार आणि एक षटकार होता. श्रीलंकेच्या 184 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. नऊ धावांवर कॅप्टन रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला झटका बसला. चामीराने रोहितला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर इशान किशनही चमकदार खेळ दाखवू शकला नाही. अवघ्या 16 रन्सवर हीरु कुमाराने त्याला शानकाकरवी झेलबाद केलं.

त्यानंतर श्रेयस अय्यरने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली व वेगाने धावा जमवल्या. दोन विकेट गेले म्हणून तो दबावाखाली आला नाही. त्याने वेगाने धावा जमवण सुरुच ठेवलं. श्रीलंकेच्या गोलंदाजांवर त्याने जोरदार प्रतिहल्ला चढवला. संजू सॅमसनसोबत मिळून त्याने तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. सॅमसनने 25 चेंडूत 39 धावा चोपल्या. यात दोन चौकार आणि तीन षटकार होते. कुमाराच्या गोलंदाजीवर फर्नांडोने स्लीपमध्ये त्याचा अप्रतिम झेल पकडला.

त्यानंतर मैदानावर आलेल्या जाडेजाने अत्यंत सहजतेने फलंदाजी केली. त्याने आणि श्रेयसने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एकक्षण ही धावसंख्या भारतासाठी अवघड ठरणार असं वाटतं होतं. पण श्रेयस आणि रवींद्रने हे लक्ष्य अत्यंत सोपं केलं. तत्पूर्वी सलामीवीर पथुम निसांका (75) आणि दासुन शानकाने (47) धमाकेदार फलंदाजीचं प्रदर्शन केलं. पण त्यांची खेळी व्यर्थ गेली.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.