IND vs SL, 1st T20,: भारताचा श्रीलंकेवर 62 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ची आघाडी

| Updated on: Feb 24, 2022 | 10:33 PM

IND vs SL, 1st T20, LIVE Cricket Score: भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे.

IND vs SL, 1st T20,: भारताचा श्रीलंकेवर 62 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ची आघाडी

IND vs SL, 1st T20, :वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेने सुरु झालेली भारताची विजयी मालिका श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Srilanka) सीरीजमध्येही कायम आहे. आज लखनऊनमध्ये झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर 62 धावांनी सहज विजय मिळवला. भारताने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने निर्धारीत 20 षटकात सहाबाद 137 धावा केल्या. इशान किशन (89), (Ishan kishan) श्रेयस अय्यर नाबाद (57) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) (44) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 199 धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची खूपच खराब सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवर भुवनेश्व कुमराने सलामीवीर पथुम निसांकाला शून्यावर बाद केलं. त्यानंतर भुवनेश्वर कुमारनेच दुसरा सलामीवीर कामिल मिसहाराला (13) धावांवर रोहित शर्माकरवी झेलबाद केले.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 24 Feb 2022 10:21 PM (IST)

    भारताचा श्रीलंकेवर मोठा विजय

    भारताने पहिल्या T 20 सामन्यात श्रीलंकेवर 62 धावांनी विजय मिळवला. भारताच्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने निर्धारीत 20 षटकात सहाबाद 137 धावा केल्या. भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

  • 24 Feb 2022 10:06 PM (IST)

    सामन्यावर भारताचं वर्चस्व

    17 षटकांच्या अखेरीस श्रीलंकेच्या सहाबाद 104 धावा झाल्या आहेत. चरित असालंका (42) आणि चामीराची (3) जोडी मैदानात आहे.

  • 24 Feb 2022 09:57 PM (IST)

    श्रीलंकेच्या 15 षटकात पाच बाद 90 धावा

    पंधरा षटकात श्रीलंकेच्या पाच बाद 90 धावा झाल्या आहेत. चरित असालंका (38) आणि चामिका करुणारत्नेची (15) जोडी मैदानात आहे.

  • 24 Feb 2022 09:32 PM (IST)

    श्रीलंकेची अवस्था चार बाद 51

    श्रीलंकेला चौथा धक्का बसला आहे. अनुभवी दीनेश चंडीमल 10 धावांवर आऊट झाला. रवींद्र जाडेजाने त्याला इशान किशनकरवी बाद केले. श्रीलंकेची अवस्था चार बाद 51 झाली आहे.

  • 24 Feb 2022 09:24 PM (IST)

    श्रीलंकेला तिसरा धक्का

    श्रीलंकेला तिसरा झटका बसला आहे. वेंकटेश अय्यरला ही विकेट मिळाली. जनित लियानगे 11 धावांवर आऊट झाला. लेगसाइडला मोठा फटका खेळताना त्याने संजू सॅमसनकडे सोपा झेल दिला.

  • 24 Feb 2022 09:19 PM (IST)

    सामन्यावर भारताचं वर्चस्व

    सहा षटकात श्रीलंकेच्या दोन बाद 29 धावा झाल्या आहेत. जनित लियानगे 8 आणि चरित असालंका 8 जोडी मैदानावर आहे.

  • 24 Feb 2022 08:53 PM (IST)

    पहिल्या चेंडूवर श्रीलंकेला पहिला धक्का

    सलामीवीर पथुम निसांकाला शून्यावरच भुवनेश्वर कुमारने बाद केलं. पहिल्याच चेंडूवर त्याला बोल्ड केलं.

  • 24 Feb 2022 08:41 PM (IST)

    श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य

    भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेची गोलंदाजी फोडून काढली. 20 षटकात दोन बाद 199 धावा केल्या. श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य दिले आहे. रोहित शर्मा 44, इशान किशन 89 श्रेयस अय्यर नाबाद 57 आणि रवींद्र जाडेजाने नाबाद 3 धावा केल्या.

  • 24 Feb 2022 08:36 PM (IST)

    श्रेयस अय्यरचं अर्धशतक

    श्रेयस अय्यरने शानदार अर्धशतक झळकावलं आहे. त्याने 25 चेंडूत 50 धावा केल्या.

  • 24 Feb 2022 08:35 PM (IST)

    भारताच्या दोन बाद 183 धावा

    भारताच्या 19 षटकात दोन बाद 183 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यर 42 आणि जाडेजा नाबाद दोन धावांवर खेळतोय.

  • 24 Feb 2022 08:26 PM (IST)

    इशान किशन अखेर बाद

    शानदार फलंदाजी करणारा इशान किशन अखेर बाद झाला. 56 चेंडूत त्याने 89 धावा केल्या. यात 10 चौकार आणि तीन षटकार होते. शनाकाने त्याला झेलबाद केले. भारताच्या दोन बाद 155 धावा झाल्या आहेत.

  • 24 Feb 2022 08:21 PM (IST)

    इशान किशनने लाहीरु कुमाराला चोपलं

    16 षटकात भारताच्या एक बाद 147 धावा झाल्या आहेत. इशान किशन 88 आणि श्रेयस अय्यर 11 धावांवर खेळतोय. लाहीरु कुमाराच्या एका षटकात इशानने 17 धावा लुटल्या. यात एक षटकार आणि दोन चौकार होते.

  • 24 Feb 2022 08:15 PM (IST)

    मराठा आरक्षण उपसमितीची वर्षां बंगल्यावरील बैठक संपली

    मराठा आरक्षण उपसमितीची वर्षां बंगल्यावर आयोजित महत्त्वपूर्ण बैठक संपली

    26 फेब्रुवारीला खासदार संभाजीराजे छत्रपती आमरण उपोषणाला बसणार

    संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणापुर्वी त्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी बैठकीचं आयोजन

    बैठकीला मराठा आरक्षण उपसमीतीच्या सदस्यांसोबत अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे एमडी, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, प्रधान सल्लागार सिताराम कुंटे देखील उपस्थित

  • 24 Feb 2022 08:11 PM (IST)

    14 षटकात भारताच्या एकबाद 125 धावा

    14 षटकात भारताच्या एकबाद 125 धावा झाल्या आहेत. इशान किशन 46 चेंडूत 72 धावांवर खेळतोय. यात आठ चौकार आणि दोन षटकार आहेत. श्रेयस अय्यर सात धावांवर खेळतोय.

  • 24 Feb 2022 08:05 PM (IST)

    रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का

    भारताच्या 12 षटकात एक बाद 112 धावा झाल्या आहेत. रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. रोहित शर्माने 32 चेंडूत 44 धावा केल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार होता. कुमाराने त्याला क्लीन बोल्ड केलं. आता श्रेयस अय्यर आणि इशान किशनची जोडी मैदानात आहे. इशान किशन 65 आणि श्रेयस अय्यर चार धावांवर खेळतोय.

  • 24 Feb 2022 07:49 PM (IST)

    भारताच्या बिनबाद 98 धावा

    दहा षटकात भारताच्या बिनबाद 98 धावा झाल्या आहेत. इशान 55 तर रोहित 41 धावांवर खेळतोय.

  • 24 Feb 2022 07:41 PM (IST)

    रोहित शर्मा- इशान किशनची धमाकेदार फलंदाजी

    रोहित शर्मा- इशान किशनची धमाकेदार फलंदाजी सुरु आहे. भारताच्या आठ षटकात 76 धावा झाल्या आहेत. इशान 47 रोहित 27 धावांवर खेळतोय.

  • 24 Feb 2022 07:33 PM (IST)

    भारताचे धावांचे अर्धशतक पूर्ण

    सहा षटकात भारताच्या 58 धावा झाल्या आहेत. इशान किशन 39 आणि रोहित शर्मा 17 धावांवर खेळतोय.

  • 24 Feb 2022 07:28 PM (IST)

    भारताच्या पाच षटकात 47 धावा

    भारताच्या पाच षटकात 47 धावा झाल्या आहेत. इशान किशन 31 आणि रोहित शर्मा 14 धावांवर खेळतोय.

  • 24 Feb 2022 07:24 PM (IST)

    इशान किशनची धमाकेदार फलंदाजी

    भारताच्या चार षटकात 40 धावा झाल्या आहेत. इशान किशन 26 आणि रोहित शर्मा 12 धावांवर खेळतोय. इशान किशनने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार लगावला.

  • 24 Feb 2022 07:19 PM (IST)

    इशान किशनचे एकाच षटकात तीन चौकार

    इशान किशन आक्रमक फलंदाजी करत आहे. त्याने करुणारत्नेला एकाच षटकात तीन चौकार लगावले. किशन 15 तर रोहित 10 धावांवर खेळतोय. भारताच्या तीन षटकात 26 धावा झाल्या आहेत.

  • 24 Feb 2022 07:12 PM (IST)

    भारताच्या डावाला सुरुवात

    भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन ही भारताची सलामीची जोडी मैदानात आहे. दोन षटकात भारताच्या 11 धावा झाल्या आहेत. रोहित 9 आणि इशान 2 धावांवर खेळतोय.

  • 24 Feb 2022 06:43 PM (IST)

    अशी आहे भारताची प्लेइंग इलेवन

    कर्णधार रोहित शर्माने आज संघात सहाबदल केले आहेत. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे सामना खेळत नाहीय. भारतः रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सैमसन , दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह

  • 24 Feb 2022 06:41 PM (IST)

    श्रीलंकेने जिंकला टॉस

    कर्णधार रोहित शर्मा टॉस हरला आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय संघ आज पहिली फलंदाजी करणार आहे.

Published On - Feb 24,2022 6:39 PM

Follow us
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.