IND vs SL, 1st Test, Day 2, Live Score: जडेजाचं शतक, भारताचा डाव 574 धावांवर घोषित, दिवसअखेर श्रीलंकेची 4 बाद 108 अशी अवस्था
IND vs SL, 1st Test, Day 2, Live Score: मोहाली कसोटीच्या पहिल्यादिवशी भारताने सहा विकेट गमावून 357 धावा केल्या आहेत. आज दुसऱ्यादिवशी चार विकेट हातात असताना, 500 धावापर्यंत पोहोचण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
मोहाली कसोटीच्या पहिल्यादिवशी भारताने सहा विकेट गमावून 357 धावा केल्या आहेत. आज दुसऱ्यादिवशी चार विकेट हातात असताना, 500 धावापर्यंत पोहोचण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. टीम इंडियाच्या या मिशनमध्ये रवींद्र जाडेजाचा रोल सर्वात जास्त महत्त्वाचा रहाणार आहे. सध्या तो अश्विनसोबत मैदानात आहे. फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही त्यांना योगदान द्यावं लागणार आहे. पण त्याआधी धावफलकावर मोठी धावसंख्या आवश्यक आहे.
Key Events
भारताने आपला पहिला डाव आठ बाद 574 धावांवर घोषित केला. भारताकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक नाबाद 175 धावा केल्या.
जाडेजा आणि ऋषभ पंतने सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दोघांनी मिळून 104 धावांची भागीदारी केली.
LIVE Cricket Score & Updates
-
जडेजाचं शतक, भारताचा डाव 574 धावांवर घोषित, दिवसअखेर श्रीलंकेची 4 बाद 108 अशी अवस्था
श्रीलंकेची पहिल्या डावात 4 बाद 108 अशी अवस्था असताना आजच्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. भारताने पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारताला 466 धावांची आघाडी मिळाली आहे. उद्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचे उर्वरित 6 गडी लवकर बाद करुन प्रतिस्पर्ध्यांना फॉलोऑन देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
-
श्रीलंकेची अवस्था बिकट
श्रीलंकेला चौथा धक्का बसला आहे. धनंजय डिसिल्वाच्या रुपाने श्रीलंकेची चौथी विकेट गेली आहे. अश्विनने त्याला पायचीत पकडला. श्रीलंकेची अवस्था चार बाद 107 झाली आहे.
1ST Test. WICKET! 38.1: Dhananjaya de Silva 1(8) lbw Ravichandran Ashwin, Sri Lanka 103/4 https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
-
श्रीलंकेचा डाव अडचणीत
श्रीलंकेने धावांचे शतक पूर्ण केलं आहे. श्रीलंकेच्या तीन बाद 103 धावा झाल्या आहेत. जसप्रीत बुमराहमे एंजलो मॅथ्यूजला 22 धावांवर पायचीत पकडलं.
1ST Test. WICKET! 33.6: Angelo Mathews 22(39) lbw Jasprit Bumrah, Sri Lanka 96/3 https://t.co/XaUgORcj5O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
श्रीलंकेच्या दोन बाद 83 धावा
श्रीलंकेच्या दोनबाद 83 धावा झाल्या आहेत. पाथुम निसांका (16) आणि एंजलो मॅथ्यूज (9) धावांवर खेळत आहेत.
-
रवींद्र जाडेजाने श्रीलंकेच्या कॅप्टनलाच फिरकीच्या जाळ्यात अडकवलं
रवींद्र जाडेजाने भारताला दुसरं यश मिळवून दिलं आहे. त्याने कॅप्टन दिमुथ करुणारत्नेला 28 धावांवर पायचीत पकडलं. जाडेजाच्या एका आत आलेल्या चेंडूवर करुणारत्ने फसला. श्रीलंकेच्या दोन बाद 60 धावा झाल्या आहेत.
1ST Test. WICKET! 24.2: Dimuth Karunaratne 28(71) lbw Ravindra Jadeja, Sri Lanka 59/2 https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
-
श्रीलंकेने अर्धशतकाची वेस ओलांडली
श्रीलंकेला पहिला धक्का देण्यात भारताला यश आलं आहे. श्रीलंकेचा सलामीवीर लाहीरु थिरीमानेला अश्विनने 17 धावांवर पायचीत पकडलं. श्रीलंकेच्या आता एक बाद 58 धावा झाल्या आहेत.
1ST Test. WICKET! 18.2: Lahiru Thirimanne 17(60) lbw Ravichandran Ashwin, Sri Lanka 48/1 https://t.co/XaUgORcj5O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
श्रीलंकेच्या बिनबाद 41 धावा
श्रीलंकेने चांगली सुरुवात केली आहे. त्यांनी बिनबाद 41 धावा केल्या आहेत. कॅप्टन करुणारत्ने 23 आणि थिरीमाने 15 धावांवर खेळत आहेत.
1ST Test. 13.3: Jayant Yadav to Dimuth Karunaratne 4 runs, Sri Lanka 39/0 https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
श्रीलंकेच्या डावाला सुरुवात
भारताने 574 धावांवर डाव घोषित केला. श्रीलंकेचे सलामीवीर मैदानात उतरले आहेत. दीमुथ करुणारत्ने 12 आणि लाहिरु थिरीमाने आठ धावांवर खेळतोय. श्रीलंकेच्या बिनबाद 21 धावा झाल्या आहेत.
-
रवींद्र जाडेजाच्या नाबाद 175 धावा, भारताने 574/8 डाव केला घोषित
श्रीलंकेच्या गोलंदाजांना भारताच्या संपूर्ण संघाला ऑलआऊट करणं जमलं नाही. भारताने आठ बाद 574 वर डाव घोषित केला. रवींद्र जाडेजा 175 धावांवर नाबाद राहिला.
Here comes the declaration and that will also be Tea on Day 2 of the 1st Test.
Ravindra Jadeja remains unbeaten on 175.#TeamIndia 574/8d
Scorecard – https://t.co/c2vTOXSGfx #INDvSL @Paytm pic.twitter.com/yBnZ2mTeku
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
भारताने ओलांडला 550 धावांचा टप्पा
श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई सुरु आहे. भारताने 550 धावांचा टप्पा ओलांडला आहे. रवींद्र जाडेजा 172 तर शमी 17 धावांवर खेळतोय. भारताच्या आठ बाद 568 धावा झाल्या आहेत.
1ST Test. 128.2: Vishwa Fernando to Mohammad Shami 4 runs, India 568/8 https://t.co/XaUgORcj5O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
रवींद्र जाडेजाची दीडशतकी खेळी
रवींद्र जाडेजा एकाबाजूने दमदार फलंदाजी करत आहे. 124 षटकात भारताच्या आठ बाद 527 धावा झाल्या आहेत. रवींद्र जाडेजाने दीडशतकाचा टप्पा ओलांडला आहे. जाडेजा 155 धावांवर खेळतोय. त्याने 16 चौकार आणि दोन षटकार लगावले आहेत. मोहम्मद शमी त्याला मैदानावर साथ देतोय.
150 for @imjadeja and he brings this up in style with a maximum ??
Live – https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm pic.twitter.com/TMrfFi2YZ5
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
सरजीच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताच्या 500 धावा पूर्ण
टीम इंडियाचा सरजी म्हणजे रवींद्र जाडेजाच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. रवींद्र जाडेजा 141 धावांवर खेळतोय. या खेळीत त्याने 15 चौकार आणि एक षटकार लगावला आहे. भारताच्या आठ बाद 508 धावा झाल्या आहेत.
1ST Test. 120.4: Lasith Embuldeniya to Ravindra Jadeja 4 runs, India 507/8 https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
भारताला आठवा धक्का
जयंत यादवच्या रुपाने भारताला आठवा धक्का बसला आहे. फर्नान्डोच्या गोलंजाजीवर जयंत यादव स्लीपमध्ये झेलबाद झाला. भारताच्या आठ बाद 471 धावा झाल्या आहेत.
1ST Test. WICKET! 113.6: Jayant Yadav 2(18) ct Lahiru Thirimanne b Vishwa Fernando, India 471/8 https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
लंचनंतर खेळाला सुरुवात, जाडेजा-यादवची जोडी मैदानात
लंचनंतर खेळाला सुरुवात झाली आहे. भारताच्या सात बाद 471 धावा झाल्या आहेत. रवींद्र जाडेजा 104 आणि जयंत यादव दोन धावांवर खेळतोय.
-
रविंद्र जाडेजाचं शानदार शतक
रविचंद्रन अश्विन लकमलच्या गोलंदाजीवर 61 धावांवर आऊट झाला. पण रवींद्र जाडेजाची दमदार फलंदाजी सुरु आहे. त्याने शानदार शतक झळकावलं आहे. जाडेजा 102 धावांवर खेळतोय. भारताच्या सात बाद 468 धावा झाल्या आहेत.
?@imjadeja brings up his 2nd Test CENTURY ??.
Live – https://t.co/XaUgORcj5O #INDvSL @Paytm pic.twitter.com/L4rYFhWLlM
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
जाडेजा-अश्विन जोडी समोर श्रीलंकन गोलंदाज हतबल
दुसऱ्यादिवशीही भारताची दमदार फलंदाजी सुरु आहे. श्रीलंकन गोलंदाजांना संघर्ष करावा लागतोय. काल नाबाद असलेली जाडेजा आणि अश्विनची जोडी अजूनही मैदानात आहे. जाडेजा 91 आणि अश्विन 56 धावांवर खेळतोय.
1ST Test. 105.4: Dhananjaya de Silva to Ravichandran Ashwin 4 runs, India 446/6 https://t.co/XaUgORcj5O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
श्रीलंकन गोलंदाज हतबल
102 षटकात भारताच्या सहाबाद 426 धावा झाल्या आहेत. जाडेजा 81 आणि अश्विन 43 धावांवर खेळतोय.
-
भारताची दमदार फलंदाजी
पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही भारताची दमदार फलंदाजी सुरु आहे. भारताने 400 धावांचा टप्पा ओलांडला आहे. रवींद्र जाडेजा 77 आणि अश्विन 24 धावांवर खेळतोय.
1ST Test. 96.6: Vishwa Fernando to Ravindra Jadeja 4 runs, India 400/6 https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2022
-
लाहिरू कुमार गोलंदाजी नाही करणार
लाहिरु कुमारला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. तो आता गोलंदाजी करणार नाही. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी एक ते दोन आठवडे लागतील.
-
जोडजा-अश्विनची जोडी मैदानात
कालच्या सहा बाद 357 धावांवरुन आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. जाडेजा आणि अश्विनची जोडी मैदानात आहे. भारताच्या सहाबाद 363 धावा झाल्या आहेत. जाडेजा 50 आणि अश्विन 11 धावांवर खेळतोय.
That’s a FIFTY for @imjadeja ??
Live – https://t.co/c2vTOXAx1p #INDvSL @Paytm pic.twitter.com/rvmFY5C1GZ
— BCCI (@BCCI) March 5, 2022
Published On - Mar 05,2022 9:40 AM