IND vs SL, 2nd T20 : श्रीलंकेचं 184 धावांच लक्ष्य सहज पार केलं, भारताची मालिकेत 2-0 विजयी आघाडी

| Updated on: Feb 26, 2022 | 10:53 PM

IND vs SL, 2nd T20: धर्मशाळा येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (India vs Srilanka) शानदार विजय मिळवला. श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) भारताच्या विजयाचे हिरो ठरले.

IND vs SL, 2nd T20 : श्रीलंकेचं 184 धावांच लक्ष्य सहज पार केलं, भारताची मालिकेत 2-0 विजयी आघाडी
भारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा टी 20 सामना

धर्मशाळा येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (India vs Srilanka) शानदार विजय मिळवला. श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) भारताच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 58 धावांची विजयी भागीदारी केली. श्रेयसच्या 44 चेंडूत नाबाद 74 धावा आणि रवींद्र जाडेजाच्या 18 चेंडूत नाबाद 45 धावांच्या बळावर भारताने श्रीलंकेवर सात विकेट राखून विजय मिळवला. भारताने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता उद्या होणारा तिसरा सामना फक्त औपचारिकता मात्र आहे.

भारताची प्लेइंग इलेवन: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह

Key Events

भारताला विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य

भारतासमोर विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य आहे. सलामीवीर पथुम निसांका (75) आणि कॅप्टन दासुन शानकाच्या (47) फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने एवढी विशाल धावसंख्या उभारली

हर्षल पटेल ठरला महागडा गोलंदाज

हर्षल पटेल महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या चार षटकात 52 धावा निघाल्या. श्रीलंकेने शेवटच्या चार षटकात 72 धावा चोपल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 26 Feb 2022 10:26 PM (IST)

    श्रीलंकेचं 184 धावांच लक्ष्य सहज पार केलं

    श्रेयस अय्यर नाबाद 74 आणि रवींद्र जाडेजाच्या 45 तुफान फलंदाजीच्या बळावर भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेवर सात विकेट राखून शानदार विजय मिळवला. भारताने तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

  • 26 Feb 2022 10:19 PM (IST)

    रवींद्र जाडेजाने श्रीलंकेची गोलंदाजी कुटली, भारत विजयाच्या जवळ

    रवींद्र जाडेजाने श्रीलंकेची गोलंदाजी कुटून काढली आहे. 16 व्या षटकात भारताच्या 175 धावा झाल्या आहेत. विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे.

  • 26 Feb 2022 10:13 PM (IST)

    भारताच्या 15 षटकात 152 धावा

    भारताची जबरदस्त फलंदाजी सुरु आहे. 15 षटकात भारताच्या तीन बाद 152 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यर 69 आणि रवींद्र जाडेजाची 17 जोडी मैदानावर आहे. भारताला विजयासाठी 30 चेंडूत 32 धावांची आवश्यकता आहे.

  • 26 Feb 2022 09:49 PM (IST)

    श्रेयस अय्यरची तुफान फलंदाजी

    श्रेयस अय्यरची तुफान फलंदाजी सुरु आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध सलग दुसरं शानदार अर्धशतक झळकवल आहे. श्रेयसने 34 चेंडूत 61 धावा केल्या आहेत.

  • 26 Feb 2022 09:37 PM (IST)

    श्रेयसची तुफान फलंदाजी

    भारताच्या नऊ षटकात दोन बाद 70 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यरने प्रवीण जयाविक्रमाच्या एका ओव्हरमध्ये सलग दोन षटकार ठोकून 14 धावा वसूल केल्या. श्रेयस अय्यर 25 चेंडूत 43 धावा केल्या आहेत. यात पाच चौकार आणि दोन षटकार आहेत.

  • 26 Feb 2022 09:26 PM (IST)

    भारताच्या दोन बाद 46 धावा

    सहा षटकात भारताच्या दोन बाद 46 धावा झाल्या आहेत. इशान किशन 16 धावांवर आऊट झाला. लाहीरु कुमाराने त्याला शानकाकरवी झेलबाद केले. श्रेयस अय्यर 25 धावांवर खेळतोय. संजू सॅमसन त्याची साथ द्यायला मैदानात आला आहे.

  • 26 Feb 2022 08:57 PM (IST)

    भारताला पहिला झटका

    रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. चामीराने त्याला क्लीन बोल्ड केले. पहिल्या षटकात भारताच्या एकबाद 9 धावा झाल्या आहेत. रोहित फक्त एक रन्स केला. इशान किशन सात धावांवर खेळतोय.

  • 26 Feb 2022 08:45 PM (IST)

    दासुन शानकाच्या 19 चेंडूत 47 धावा

    श्रीलंकेने भारताला विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य दिले आहे. सलामीवीर पथुम निसांका (75) धावा आणि कॅप्टन दासुन शानकाच्या 19 चेंडूत नाबाद (47) धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने निधारीत 20 षटकात पाच बाद 183 धावा केल्या. शानकाने नाबाद 47 धावांच्या खेळीत दोन चौकार, पाच षटकार लगावले. शेवटच्या चार षटकात श्रीलंकेने 72 धावा केल्या. हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात 23 धावा काढल्या. तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात 52 धावा दिल्या.

  • 26 Feb 2022 08:33 PM (IST)

    निसांका आऊट, पण कॅप्टन शानकाची जबरदस्त फलंदाजी

    श्रीलंकेच्या 19 षटकात चार बाद 160 झाल्या आहेत. पथुम निसांकाला (75) धावांवर भुवनेश्वर कुमारने पायचीत पकडलं. त्याने 53 चेंडूत 75 धावा केल्या. यात 11 चौकार होते. कर्णधार दासुन शानका जबरदस्त फलंदाजी करत आहे. त्याने 13 चेंडूत (29) धावा केल्या आहेत.

  • 26 Feb 2022 08:11 PM (IST)

    बुमराहला मिळाली चौथी विकेट

    श्रीलंकेच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. पण त्यांच्या चार विकेट गेल्या आहेत. श्रीलंकेच्या 15 षटकात चार बाद 103 धावा झाल्या आहेत. दिनेश चंडीमलला बुमराहने रोहित शर्माकरवी झेलबाद केले.

  • 26 Feb 2022 08:04 PM (IST)

    श्रीलंका तीन बाद 91 धावा

    हर्षल पटेलने एका सुंदर स्लोअरवन चेंडूवर कामिल मिशाराला (1) फसवलं. त्याने कव्हरच्या दिशेने मारलेला फटक्यावर श्रेयस अय्यरने सुंदर झेल घेतला. तेरा षटकात श्रीलंकेच्या एक बाद 91 धावा झाल्या आहेत.

  • 26 Feb 2022 07:48 PM (IST)

    भारताला दुसरं यश

    युजवेंद्र चहलने भारताला दुसरं यश मिळवून दिलं आहे. दहा षटकात श्रीलंकेच्या दोनबाद 71 धावा झाल्या आहेत. चरित असालंकाला युजवेंद्र चहलने अवघ्या दोन धावांवर पायचीत पकडलं.

  • 26 Feb 2022 07:42 PM (IST)

    श्रीलंकेला पहिला धक्का

    रवींद्र जाडेजाची धुलाई करणारा दानुष्का गुणतिलका अखेर आऊट झाला आहे. 29 चेंडूत त्याने 38 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. जाडेजाने त्याला वेंकटेश अय्यरकरवी झेलबाद केले.

  • 26 Feb 2022 07:37 PM (IST)

    श्रीलंकेचे धावांचे अर्धशतक पूर्ण

    श्रीलंकेच्या आठ षटकात बिनबाद 51 धावा झाल्या आहेत. पथुम निसांका (25) आणि दानुष्का गुणतिलका (22) ही सलामीची जोडी खेळत आहे.

  • 26 Feb 2022 07:31 PM (IST)

    श्रीलंकेची सावध सुरुवात

    श्रीलंकेच्या सहा षटकात 32 धावा झाल्या आहेत. पथुम निसांका (14) आणि दानुष्का गुणतिलका (14) ही सलामीची जोडी मैदानात आहे.

  • 26 Feb 2022 07:27 PM (IST)

    श्रीलंकेच्या बिनबाद 25 धावा

    पाच षटकात श्रीलंकेच्या बिनबाद 25 धावा झाल्या आहेत. पथुम निसांका (8) आणि दानुष्का गुणतिलका (13) ही सलामीची जोडी मैदानात आहे. पाचव षटकं हर्षल पटेलने टाकलं.

  • 26 Feb 2022 07:17 PM (IST)

    भुवनेश्वर-बुमराहची टिच्चून गोलंदाजी

    तीन षटकात श्रीलंकेच्या बिनबाद 13 धावा झाल्या आहेत. पथुम निसांका (2) आणि दानुष्का गुणतिलका (7) ही सलामीची जोडी मैदानात आहे. तिसरं षटक भुवनेश्वर कुमारने टाकलं

  • 26 Feb 2022 07:12 PM (IST)

    श्रीलंकेच्या बिनबाद सात धावा

    दोन षटकात श्रीलंकेच्या बिनबाद सात धावा झाल्या आहेत. पथुम निसांका (1) आणि दानुष्का गुणतिलका (2) ही सलामीची जोडी मैदानात आहे. दुसरं षटक जसप्रीत बुमराहने टाकलं.

  • 26 Feb 2022 07:06 PM (IST)

    श्रीलंकेची सलामीची जोडी मैदानात

    पहिल्या षटकात श्रीलंकेच्या बिनाबाद 2 धावा झाल्या आहेत. पथुम निसांका आणि दानुष्का गुणतिलका ही सलामीची जोडी मैदानात आहे. पहिलं षटक भुवनेश्वर कुमारने टाकलं

  • 26 Feb 2022 06:57 PM (IST)

    असा आहे श्रीलंकेचा संघ

    दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कामिल मिशारा, चरित असालंका, दिनेश चांदीमल (विकेटकीपर), चामिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, प्रवीण जयाविक्रमा, लाहिरू कुमारा, बुनुरा फर्नांडो आणि दानुष्का गुणतिलका.

  • 26 Feb 2022 06:55 PM (IST)

    असा आहे भारताचा संघ

    रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह

Published On - Feb 26,2022 6:54 PM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.