IND vs SL: नवीन वर्ष, नवीन टीम पण सवय मात्र जुनीच, असं झाल्यास पुण्यात होईल टीम इंडियाचा पराभव

IND vs SL: मुंबईत टीम इंडियाने निसटता विजय मिळवला. पण पुण्यात चित्र बदललं नाही, तर मात्र पराभवाचा सामना करावा लागेल.

IND vs SL: नवीन वर्ष, नवीन टीम पण सवय मात्र जुनीच, असं झाल्यास पुण्यात होईल टीम इंडियाचा पराभव
ind vs sl Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 8:18 AM

पुणे: टीम इंडियासाठी वर्ष बदललय. कॅप्टन बदललाय. टीम बदललीय. पण टीमची सवय मात्र बदलेली नाही. नव्या वर्षातील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा पराभव थोडक्यात टळला. टीम इंडियाने अवघ्या 2 रन्सनी निसटता विजय मिळवला. नव्या वर्षात टीम बदललीय. पण जुनी सवय मात्र कायम आहे. पुण्यातही तीच सवय कायम राहिली, तर कदाचित मुंबईसारखी नशिबाची साथ मिळणार नाही. पराभव लिहिला जाईल. मुंबईत टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता.

ही जुनी सवय कुठली?

तुम्हाला प्रश्न पडला असेल, टीम इंडियाची ही जुनी सवय कुठली आहे? मुंबईत टीम इंडियाचा टॉप ऑर्डर फेल झाला. काही विकेट्स झटपट गेल्या. टीम इंडिया बऱ्याच प्रमाणात टॉप ऑर्डरवर अवलंबून असते. मुंबईत नव्या टीमची हीच स्थिती होती. जुन्या टीमची सुद्धा हीच कमजोरी होती.

नवीन टीम इंडिया कशी?

टीम इंडियाच्या नव्या आणि जुन्या टीममध्ये काय अंतर आहे? ते समजून घ्या. पहिल्या टी 20 सामन्यात दोन प्लेयर्सनी डेब्यु केला. ओपनर्स बदलले. मीडल ऑर्डरमध्ये अनुभवी फलंदाजांची कमतरता होती. गोलंदाजांची फळी सुद्धा तुलनेने नवीन होती. जुन्या टीममध्ये रोहित, राहुल, विराट, शमी आणि भुवनेश्वर सगळे एकत्र खेळताना दिसायचे. नव्या वर्षात मुंबईच्या मैदानावर उतरलेल्या टीममध्ये मोठी नावं नव्हती. टीम नवी पण सवय मात्र जुनी

नव्या टीमकडून जी अपेक्षा होती, ते त्यांनी केलं. पण जे करायला नको होतं, ते सुद्धा केलं. म्हणूनच पुण्यात त्याच चुकांची पुनरावृत्ती परवडणार नाही. मुंबईत पहिल्या सामन्यात टॉप ऑर्डरचे बॅट्समन चालले नाहीत. त्याचा दबाव टीमवर दिसून आला. वरच्या फळीतील बॅट्समनमध्ये पार्टनरशिप झाली नाही. निम्मी टीम 14.1 ओव्हर्समध्ये 92 धावात तंबूत परतली होती. पुढच्या सामन्यात टीम इंडियाला ही चूक परवडणारी नाही. वानखेडेवर 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणं कठीण नाहीय. पण श्रीलंकेला ते नाही जमलं. आता पुण्यात त्यांचे बॅट्समन अशी चूक करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे टीम इंडियाला चूका सुधाराव्या लागतील.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.