IND vs SL Probable Playing 11| आज तीन पेसर की दोन? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11?

IND vs SL Probable Playing 11 | टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचल्यात जमा आहे. पण आज श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच सेमीफायनलच तिकीट पक्क होईल. टीम इंडिया या वनडे वर्ल्ड कपमध्ये स्वप्नवत प्रदर्शन करतेय. त्यामुळे टीम इंडियाचे चाहते सुखावले आहेत. त्यांच्या टीमकडून अपेक्षाही वाढल्या आहेत.

IND vs SL Probable Playing 11| आज तीन पेसर की दोन? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11?
IND vs SL ODI World Cup 2023Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 9:14 AM

मुंबई : टीम इंडिया आज श्रीलंके विरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच आहे. टीम इंडियाकडे मॅच जिंकून सलग चौथ्यांदा वर्ल्ड कप सेमीफायनलच तिकीट निश्चित करण्याची संधी आहे. टीम इंडियाने आतापर्यंत सर्वच्या सर्व 6 सामने जिंकले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करतो का? याकडे सगळ्यांच लक्ष असेल. मॅचच्या एकदिवस आधी रोहित जे काही बोललो, त्यावरुन स्पष्ट संकेत मिळत नाहीयत. वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय चाहत्यांना टीम इंडियाकडून जी अपेक्षा होती, आतापर्यंत त्यांनी तसच प्रदर्शन केलय. वर्ल्ड कप आधीच टीम इंडियाच प्रदर्शन पाहिलं, तर टीम इंडियाने अपेक्षेपेक्षा चांगलं प्रदर्शन केलय असच कोणीही म्हणेल. प्रत्येक खेळाडूने जी संधी मिळाली, त्यानुसार त्यांनी प्रदर्शन केलय. श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. आजचा सामना रोहित शर्माच्या घरच्या मैदानावर होत आहे.

टीम इंडियाची आज सामन्याच्या प्लेइंग इलेव्हन काय असेल?. सहाजिक 11 पैकी 9 खेळाडू तेच असतील. फक्त एक-दोन बदल होऊ शकतात. ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आजच्या सामन्यातही खेळणार नाहीय, हे स्पष्ट आहे. सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी या दोघांच खेळण निश्चित आहे. त्यांनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दमदार प्रदर्शन केलं होतं. नजर श्रेयस अय्यरवर असेल. एक इनिंग सोडून तो फार काही करु शकलेला नाहीय. खासकरुन शॉर्ट पीच चेंडू खेळताना तो अडचणीत येतो. अशा स्थितीत श्रेयस अय्यरच्या जागी इशान किशनला खेळवण्याचा पर्याय आहे. सध्या टीम मॅनेजमेंटचा जो अप्रोच आहे, तो पाहून श्रेयस अय्यर आणखी एक संधी मिळेल असं दिसतय.

मुंबईची विकेट कशी?

टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्व सामन्यात तीन वेगवान गोलंदाजांना खेळवलय. हार्दिक पांड्या फिट होता, तेव्हा त्याच्यासह 4 पेस बॉलर टीममध्ये होते. हार्दिक सध्या टीममध्ये नाहीय. त्यामुळे तीन पूर्णवेळ पेस बॉलर खेळतायत. मुंबईची विकेट वेगवान गोलंदाजांना साथ देणारी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही तीन वेगवान गोलंदाजच दिसतील. मॅचच्या एकदिवस आधी रोहितने प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व गोलंदाज एकदम फिट आहेत, असं सांगितलं.

अश्विनला संधी मिळणार का?

आर. अश्विनला संधी मिळणार का? हा प्रश्न आहे. अश्विनला फक्त ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यात संधी मिळाली होती. तिथे त्याने 2 विकेट काढले. त्यानंतर टीम इंडिया कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा या स्पिन जोडीसह मैदानात उतरतेय. मुंबईमध्ये सुद्धा हेच चित्र राहण्याची शक्यता आहे. रोहितने स्पष्टपणे काही सांगितलेलं नाही. त्याने फक्त एवढच म्हटलय की, गरज पडल्यास तीन वेगवान गोलंदाज आणि दोन स्पिनरसह टीम इंडिया मैदानात उतरु शकते. त्यामुळे अश्विनला खेळवणार का? हा प्रश्न आहे.

टीम इंडिया संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.