Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: विराट, ऋषभला जमलं नाही, ते ‘बापू’ने मैदानावर करुन दाखवलं

IND vs SL: मोहाली येथे सुरु असलेल्या भारत-श्रीलंका कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. काल ऋषभ पंत आणि आज रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) दमदार फलंदाजी केली.

IND vs SL: विराट, ऋषभला जमलं नाही, ते 'बापू'ने मैदानावर करुन दाखवलं
भारत-श्रीलंका कसोटी सामना Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 12:15 PM

चंदीगड: मोहाली येथे सुरु असलेल्या भारत-श्रीलंका कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. काल ऋषभ पंत आणि आज रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) दमदार फलंदाजी केली. जाडेजाने आज शानदार शतक झळकावलं. तब्बल चार वर्षानंतर रवींद्र जाडेजाने कसोटीमध्ये शतक झळकावलं आहे. ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाचं कसोटी क्रिकेटमधील हे दुसरं शतक (Century)आहे. मोहाली कसोटीच्या (Mohali Test) पहिल्या डावात जाडेजाने शतक झळकावलं. जाडेजाच्या या शतकामुळे भारताची या कसोटीत विशाल धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. डावखुऱ्या रवींद्र जाडेजाने यापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध राजकोटमध्ये 2018 साली शेवटचं शतक झळकावलं होतं. त्यावेळी तो 100 धावांवर नाबाद होता. जाडेजाने 160 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्याने एका डावात 10 चौकार लगावले. विराटची विकेट काढणाऱ्या एंबुलडेनियाच्या चेंडूवर एक धाव घेऊन जाडेजाने शतक झळकावलं. शतकाबरोबर जाडेजाने क्रिकेटच्या या मोठ्या फॉर्मेटमध्ये आपल्या नावावर सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली आहे.

जाडेजाच्या दोन शतकी भागीदाऱ्या

रवींद्र जाडेजाने आपलं शतक झळकवतान दोन शतकी भागीदाऱ्याही केल्या. सहाव्या विकेटसाठी ऋषभ पंतसोबत मिळून 104 धावांची आणि सातव्या विकेटसाठी अश्विनसोबत 130 धावांची भागीदारी केली. दुसऱ्यादिवसाच्या पहिल्या सत्रात जाडेजाने हे शतक झळकावलं. शतक पूर्ण केल्यानंतर जाडेजाने आपल्या स्टाइलमध्ये बॅटला तलवारीसारखं चालवून सेलिब्रेशन केलं.

जाडेजाच्या शतकामुळे भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने

भारतीय संघ सध्या सहज 500 धावसंख्येपर्यंत पोहोचेल, असं चित्र दिसतय. आज सकाळी भारताने सहाबाद 357 धावांवरुन डाव पुढे सुरु केला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जाडेजा आणि अश्विनने सुंदर फलंदाजी केली. दोघांनी चौफेर चांगले ड्राइव्हज मारले. व धावा वसूल केल्या. अश्विन 61 धावांवर आऊट झाला. त्याचं कसोटी क्रिकेटमधील हे 12 व अर्धशतक होतं.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.