Rohit Sharma तिथून चाललेला, त्याला एक लहान मुलगा रडताना दिसला, आणि….VIDEO
रोहित शर्माच्या या लहान चाहत्याच वय 10 ते 12 वर्ष असेल. बारसापारा ग्राऊंडच्या प्रॅक्टिस एरियामध्ये स्टँडच्या मागे तो उभा होता. तिथे उभे राहून सर्वजण आपल्या लाडक्या खेळाडूंना प्रॅक्टिस करताना बघत होते.
गुवाहाटी: क्रिकेटर्सचे वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्स असतात. काही फॅन्स हे साधे-सरळ असतात, तर काही क्रिकेटर्सना त्यांचं दैवत मानतात. काही फॅन्स खूप क्रेझी असतात. ते कुठलीही मर्यादा ओलांडू शकतात. काही फॅन्स खूपच इमोशनल असतात. या फॅन्सना वय नसतं. लहान मुलांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत क्रिकेटर्सचे फॅन्स असतात. गुवाहाटीमध्ये मॅचच्या एकदिवस आधी टीम इंडियाची प्रॅक्टिस सुरु होती, त्यावेळी रोहित शर्माची ओळख त्याच्या एका लहान चाहत्याबरोबर झाली. कॅप्टन रोहित शर्माचा हा फॅन खूपच इमोशनल होता. रोहितला पाहून त्याला रडू कोसळलं.
रोहितला पाहून रडू कोसळलं
रोहित शर्माच्या या लहान चाहत्याच वय 10 ते 12 वर्ष असेल. बारसापारा ग्राऊंडच्या प्रॅक्टिस एरियामध्ये स्टँडच्या मागे तो उभा होता. तिथे उभे राहून सर्वजण आपल्या लाडक्या खेळाडूंना प्रॅक्टिस करताना बघत होते. प्रॅक्टिस संपवून रोहित तिथून जात होता, त्यावेळी रोहितला पाहून लहानगा मुलगा रडू लागला.
रोहित सर, रोहित सर
आपल्या लहान चाहत्याला रडताना पाहून रोहित त्याच्याजवळ गेला. त्याला रडण्याच कारण विचारलं. त्यावर लहानग्याने तू माझा फेवरेट क्रिकेटर आहेस, असं उत्तर दिलं. मग, तू रडतोयस का? असं त्याला विचारलं व रोहितने प्रेमाने त्याचे गाल खेचले. प्रेमाने त्याच्या गालावर थापडही मारली. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेली गर्दी रोहित सर, रोहित सर बोलून फोटो काढण्याचा आग्रह करत होती.
Cricketer Rohit Sharma interacting with an young cricket fan from Assam in Guwahati.
Adorable Moments!@ImRo45 pic.twitter.com/Nyzc4D9fHg
— Pramod Boro (@PramodBoroBTR) January 9, 2023
बारसापारा येथे भारत-श्रीलंका पहिली वनडे
आज श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना गुवाहाटी येथे होणार आहे. गुवाहाटी जवळच्या बारसापारा स्टेडियमवर ही मॅच होईल. श्रीलंकेची टीम पहिल्यांदा इथे खेळणार आहे. भारताच्या अनेक खेळाडूंसाठी हे नवीन मैदान आहे.