IND vs SL: 1 ओव्हरमध्ये 7 SIX मारणारा घेणार श्रीलंकेचा समाचार, टीम इंडिया उतरवणार ‘ही’ Playing XI

IND vs SL: टीम इंडिया वर्षाच्या पहिल्याच सीरीजमध्ये 3 सुपर स्टार खेळाडूंशिवाय उतरणार आहे. त्यामुळे Playing XI कशी असेल?

IND vs SL: 1 ओव्हरमध्ये 7 SIX मारणारा घेणार श्रीलंकेचा समाचार, टीम इंडिया उतरवणार 'ही' Playing XI
Hardik pandyaImage Credit source: GETTY IMAGES
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 4:07 PM

मुंबई: T20 फॉर्मेटपासून टीम इंडिया नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. 3 T20 सामन्यांच्या सीरीजमधील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हे मैदान कोणाला किती अनुकूल ठरतं, ते सर्व टॉसवर अवलंबून असेल. मुंबईचा इतिहास सांगतो, टॉस महत्त्वाचा रोल प्ले करेल. हार्दिक पंड्या टी 20 टीमच नेतृत्व करतोय. लवकरच टी 20 टीमचा कायमस्वरुपी कॅप्टन म्हणून त्याचं नाव जाहीर होऊ शकतं. टीमची निवड हे हार्दिकसमोरच मुख्य आव्हान असेल.

वर्षाच्या पहिल्याच सीरीजमध्ये टीम आपल्या 3 सुपर स्टार खेळाडूंशिवाय उतरत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या टीममध्ये नाहीय. श्रीलंकेविरुद्ध कुठली प्लेइंग इलेव्हन निवडायची, ही मॅनेजमेंटसमोरची मुख्य डोकेदुखी असेल.

ओव्हरमध्ये 7 सिक्स मारणारा घेणार श्रीलंकेचा समाचार

प्लेइंग इलेव्हनबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जातायत. PTI च्या वृत्तानुसार इशान किशनला ओपनिंगसाठी पहिली पसंती असेल. एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्स मारणारा ऋतुराज गायकवाड दुसऱ्या ओपनरच्या भूमिकेत दिसू शकतो. ऋतुराजने उत्तर प्रदेश विरुद्धच्या लिस्ट ए सामन्यात 16 सिक्स आणि 10 चौकार मारुन डबल सेंच्युरी झळकवली होती. याच सामन्यात त्याने 16 पैकी 7 षटकार एकाच ओव्हरमध्ये मारल्या होत्या. 5 वा चेंडू नोबॉल होता. त्यावरही गायकवाडने सिक्स मारला.

इशानचा जोडीदार कोण?

यूपी विरुद्धच्या त्या डबल सेंच्युरीनंतर गायकवाडने बॅक टू बॅक लिस्ट ए मध्ये दोन सेंच्युरी मारल्या. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळालय. महाराष्ट्राकडून ओपनिंगला येताना त्याने 5 मॅचमध्ये 600 पेक्षा जास्त धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध तोच सलामीसाठी दावेदार असेल.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, शुभमन गिलला डेब्युची संधी मिळू शकते. म्हणजेच इशान किशनसोबत तो ओपनिंगला येईल. असं झाल्यास देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या ऋतुराजला बेंचवर बसाव लागेल.

मीडल ऑर्डरमध्ये हे खेळाडू

मीडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा, संजू सॅमसन आणि अक्षर पटेलला संधी मिळू शकते. त्याशिवाय वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि हर्षल पटेल खेळू शकतात. युजवेंद्र चहलचा स्पेशलिस्ट स्पिनर म्हणून समावेश होऊ शकतो. श्रीलंकेविरुद्ध संभाव्य प्लेइंग XI

इशान किशन, शुभमन गिल/ ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, (कॅप्टन) दीपक हुड्डा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, युजवेंद्र चहल

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.