IND vs SL: टीम इंडियाच्या 2 प्लेयर्सना शेवटची संधी? फ्लॉप झाल्यास करिअर संपणार?

IND vs SL: टीम इंडियाच्या दोन खेळाडूंसाठी टी 20 सीरीज महत्त्वाची संधी आहे. मागच्या काही सीरीजमध्ये हे खेळाडू विशेष प्रदर्शन करु शकलेले नाहीत.

IND vs SL: टीम इंडियाच्या 2 प्लेयर्सना शेवटची संधी? फ्लॉप झाल्यास करिअर संपणार?
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 5:33 PM

India vs Sri Lanka, 2023: भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून 3 T20 सामन्यांची सीरीज सुरु होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिली मॅच होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. टीम इंडियाच्या दोन खेळाडूंसाठी ही टी 20 सीरीज त्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. हे दोन खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजमध्ये अपयशी ठरले, तर त्यांचं टी 20 मधील आंतरराष्ट्रीय करिअर धोक्यात येऊ शकतं.

दोघांना चांगली कामगिरी करुन दाखवावी लागेल

मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी 20 वर्ल्ड कप झाला. या टुर्नामेंट या दोन प्लेयर्सना एकाही मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. टीम इंडियात स्पर्धा वाढतेय. त्यामुळे या दोन प्लेयर्सच स्थान धोक्यात येऊ शकतं. श्रीलंकेविरुद्धच्या या सीरीजमध्ये लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला चांगली कामगिरी करुन दाखवावी लागेल.

चहल, हर्षलच्या स्थानाला धोका का? ते समजून घ्या

युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल अपयशी ठरल्यास त्यांना टीम इंडियातील स्थान गमवाव लागू शकतं. युजवेंद्र चहलने मागच्या 10 टी 20 इंटरनॅशनल सामन्यात फक्त 10 विकेट घेतल्यात. यात चार टी 20 सामन्यात चहलला एकही विकेट मिळालेली नाही. हर्षल पटेलने शेवटच्या 7 टी 20 इंटरनॅशनल मॅचेसमध्ये फक्त 4 विकेट्स काढल्यात. मागच्या 11 टी 20 सामन्यात हर्षल पटेलने 4 वेळा 45 पेक्षा जास्त धावा दिल्यात. दोघांवर विश्वास राहिलेला नाही?

भारतीय टीम मॅनेजमेंटला युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेलवर तितका विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच टी 20 वर्ल्ड कपच्या एकाही सामन्यात दोघांना संधी मिळाली नाही. हर्षल पटेल डेथ ओव्हर्समध्ये धावा वाचवण्याशिवाय विकेट काढण्यासाठी ओळखला जातो. युजवेंद्र चहल मीडल ओव्हर्समध्ये विकेट काढतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.