IND vs SL : आतापर्यंत कायमच भारत श्रीलंका संघावर भारी, असा आहे Head to Head रेकॉर्ड

भारतीय विरुद्द श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी आतापर्यंत भारत आणि श्रीलंका आमने-सामने आले असतानाच्या रेकॉर्ड्सवर एक नजर टाकूया.

IND vs SL : आतापर्यंत कायमच भारत श्रीलंका संघावर भारी, असा आहे Head to Head रेकॉर्ड
आतापर्यंतच्या सामन्यात भारत श्रीलंका संघावर भारी पडला आहे.
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 10:46 AM

कोलंबो : भारतीय संघासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून आज (18 जुलै) भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket) श्रीलंका क्रिकेट टीमशी (India vs Sri Lanka) एकदिवीसीय मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) नेतृत्त्व करत असलेल्या भारतीय संघात बरेच महत्त्वाचे खेळाडू नसले तरी नवख्या खेळाडूंचा खेळ पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या नवख्या खेळाडूंची आतापर्यंतची खेळी आणि आयपीएल रेकॉर्ड पाहता कोणीही कधीही सामना पलटू शकतं. पण या सामन्यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातील आतापर्यंतचे रेकॉर्ड (Head to head Record) जाणने ही गरजेचे आहेय

विशेष गोष्ट म्हणजे एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक सामने एकमेंकाविरुद्ध खेळणारे संघ म्हणजे  भारत आणि श्रीलंका. दोन्ही संघानी आतापर्यंत विक्रमी 159 वनडे सामने खेळले आहे. 1979 च्या विश्व चषकात दोन्ही संघ पहिल्यांदा एकमेंकाशी भिडले होते. यावेळी श्रीलंका संघाने सामना जिंकला होता. मात्र त्यानंतर कायमच भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवत अनेकदा श्रीलंकेवर सरशी केली आहे. दोन्ही संघात शेवटचा सामना 2019 विश्वचषकावेळी खेळला गेला होता. ज्यातही भारतच विजयी झाला होता.

भारत-श्रीलंका : असे आहेत रेकॉर्ड

  • आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 159 सामन्यांत भारताचा पगडा जड असून भारताने 91 वेळा विजय नोंदवला आहे. तर श्रीलंका संघाने 56 सामने जिंकले असून एक मॅच टाय तर 11 सामने अनिर्णीत सुटले आहेत.
  • दोन्ही संघात आतापर्यंत खेळवल्या गेलेल्या सामन्यात तीन वेळा 400 हून अधिकची धावसंख्या झाली आहे. ज्यात सर्वात मोठी धावसंख्या 414 असून 2009 मध्ये राजकोट येथील सामन्यात भारताने 414 रन केले होते. ज्याच्या बदल्यात श्रीलंकेने देखील 411 रन केले होते. मात्र अखेर 3 धावांनी भारताचाच विजय झाला.
  • दोन्ही संघात अनेक दिग्गज फलंदाज होऊन गेले. ज्यांनी धावांचा डोंगर रचला. पण या सर्वात बाजी मारली ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने. सचिनने श्रीलंकेविरुद्ध 84 सामन्यांत 3 हजार 113 रन केले आहेत.
  • शतकांचा विचार करता सचिन आणि विराट कोहली बरोबरीवर आहेत. दोघांनी श्रीलंकेविरुद्द 8-8 शतक ठोकले आहेत. तर श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने भारताविरुद्ध 7 शतक केले आहेत.
  • गोलंदाजीत मात्र श्रीलंका संघ सरत असून महान फिरकीपटू मुथय्या मुरलीथरन याने एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्द 74 विकेटस पटकावले आहेत. तर भारताकडून झहीर खानने 66 विकेट घेतले आहेत.

संबंधित बातम्या 

India vs Sri Lanka, 1st ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

IND vs SL : श्रीलंका संघाकडून एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची घोषणा, ‘या’ अष्टपैलू खेळाडूला सोपवलं कर्णधारपद

IND vs SL : सामना सुरु होण्याआधीच श्रीलंका संघाला दोन झटके, हे दोन खेळाडू सामना खेळण्यापासून मुकणार

(IND vs Sri Lanka Match will Start soon know India vs Sri Lanka Head to head Record)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.