IND vs WA: ऑस्ट्रेलियात दुसरा सामना, विराट कोहली, केएल राहुल खेळणार?
IND vs WA: किती वाजता सुरु होणार सामना? कुठे पाहता येणार?
मुंबई: टीम इंडियाच्या (Team India) ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) अभियानाची सकारात्मक सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने पहिल्या सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय मिळवला. पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला असला, तरी अजूनही रोहित शर्मासमोर काही प्रश्न आहेत. विराट कोहली, (Virat Kohli) केएल राहुल पहिल्या सराव सामन्यात खेळले नाहीत. दुसऱ्या सामन्यात ते खेळणार? रविचंद्रन अश्विनला सुद्धा संधी मिळू शकते.
कुठे सामना पाहता येईल?
डेथ ओव्हर्समधील बॉलिंग अजूनही चिंतेचा विषय आहे. हर्षल पटेल अजूनही धावा देतोय. त्याला गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल. टीम इंडिया दुसरा सराव सामना खेळणार आहे. पर्थच्या वाका स्टेडियमवर गुरुवारी सकाळी 11 वाजता टीम इंडिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा सराव सामना होईल. या मॅचचे वाका क्रिकेटच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला थेट लाइव्ह प्रक्षेपण पाहता येईल.
ही मॅच का महत्त्वाची?
टीम इंडिया दुसऱ्या सराव सामन्यातही विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियन खेळपट्टी, तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने हे सराव सामने महत्त्वाचे आहेत. या मॅचमध्ये मिळवलेला विजय टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपसाठी आत्मविश्वास देऊन जाईल.
मोठ्या मैदानात काय चॅलेंज?
टीम इंडियातील पाच खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात गेले आहेत. तिथल्या कंडीशन्सशी जुळवून घेण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे. ऑस्ट्रेलियन खेळपट्टया वेग आणि बाऊन्ससाठी ओळखल्या जातात. मोठ्या मैदानात फलंदाजांसाठी चॅलेंज आहे. पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंह चमकले होते. अर्शदीपने तीन विकेट काढल्या तर सूर्यकुमारने अर्धशतक ठोकलं होतं.