IND vs WA: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियात विजयी शुभारंभ, सूर्यकुमार-अर्शदीप ठरले हिरो
IND vs WA: T20 वर्ल्ड कप आधी चांगले संकेत, टीम इंडिया जिंकली, कोण कसं खेळलं जाणून घ्या...
मुंबई: टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियात विजयी सुरुवात केली आहे. पुढच्या काही दिवसात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) सुरु होणार आहे. त्याआधी हा विजय म्हणजे टीम इंडियासाठी चांगले संकेत आहेत. टीम इंडियाने आज ऑस्ट्रेलियात (Australia) पहिला सराव सामना खेळला. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या आणि तिथल्या वातावरणाचा सराव व्हावा हा त्यामागे उद्देश आहे. टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या टीमवर 13 धावांनी विजय मिळवला.
अर्शदीपने किती विकेट काढल्या?
टीम इंडियाच्या या विजयात सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंह चमकले. अर्शदीप सिंहने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलं. त्याने तीन विकेट काढले. मागच्या काही सामन्यात मार खाणाऱ्या भुवनेश्वर कुमारने दोन विकेट काढल्या. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 158/6 धावा केल्या.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून कोण चांगलं खेळलं?
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या टीमने 145/8 धावा केल्या. टीम इंडियाने 13 धावांनी सामना जिंकला. सॅम फॅनिंगने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 59 धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 52 धावा केल्या. त्या बळावर टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य दिले.
रोहित शर्मा फ्लॉप
टीम इंडिया आज वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सराव सामना खेळला. पहिल्याच प्रॅक्टिस मॅचमध्ये टीम इंडियाने फक्त 158 धावा केल्या. रोहित शर्मा, ऋषभ पंत सारखे फलंदाज फ्लॉप ठरले. अपवाद फक्त सूर्यकुमार यादवचा. त्याने फलंदाजीत आपली ताकत दाखवून दिली.
सूर्याने सावरला डाव
सूर्यकुमार यादवने प्रॅक्टिस मॅचमध्ये शानदार अर्धशतक झळकावलं. त्याने 52 धावा फटकावल्या. सूर्यकुमार यादवने आधी टीम इंडियाचा डाव सावरला. त्यानंतर आपल्या स्टाइलमध्ये वेगवान बॅटिंग केली.
That’s that from the practice match against Western Australia.#TeamIndia win by 13 runs.
Arshdeep Singh 3/6 (3 overs) Yuzvendra Chahal 2/15 Bhuvneshwar Kumar 2/26 pic.twitter.com/NmXCogTFIR
— BCCI (@BCCI) October 10, 2022
हार्दिकने किती धावा केल्या?
सूर्यकुमार यादवशिवाय हार्दिक पंड्याने 27 आणि दीपक हुड्डाने 22 धावा केल्या. कॅप्टन रोहित शर्मा फक्त 3 रन्सवर आऊट झाला. ऋषभ पंतने 17 चेंडूत 8 धावा केल्या. दिनेश कार्तिकने नाबाद 19 धावा केल्या. टीमची धावसंख्या 150 पार पोहोचवली.
सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने 23 सामन्यात 40 पेक्षा जास्त सरासरीने 801 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 6 अर्धशतक आहेत.