IND vs WI 1st ODI: पराभवानंतर वेस्ट इंडिजला आणखी एक झटका, भारताला त्रासदायक ठरणार खेळाडूच सीरीज मधून बाहेर

IND vs WI 1st ODI: भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात (ODI) वेस्ट इंडिजचा (IND vs WI) पराभव झाला. त्यानंतर आता वेस्ट इंडिजला आणखी एक धक्का बसला आहे.

IND vs WI 1st ODI: पराभवानंतर वेस्ट इंडिजला आणखी एक झटका, भारताला त्रासदायक ठरणार खेळाडूच सीरीज मधून बाहेर
west indies team
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 2:03 PM

मुंबई: भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात (ODI) वेस्ट इंडिजचा (IND vs WI) पराभव झाला. त्यानंतर आता वेस्ट इंडिजला आणखी एक धक्का बसला आहे. कोरोनाची लागण झालेला टीमचा स्टार ऑलराऊंडर जेसन होल्डर (Jason Holder) संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. सीरीज मध्ये वेस्ट इंडिजचा संघ आधीच 1-0 ने मागे पडला आहे. त्यात होल्डरची अनुपस्थिती त्यांच्यासाठी आणखी एक झटका आहे. होल्डर बांगलादेश विरुद्ध झालेल्या वनडे, टी 20 आणि कसोटी मालिकेत खेळला नव्हता. तो एका मोठ्या ब्रेक नंतर संघात पुनरागमन करणार होता. आता त्याला पुनरागमनासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.

जेसन होल्डर न खेळणं ही भारतासाठी चांगली बातमी

होल्डर सीरीज मध्ये खेळणार नाहीय, ही भारतासाठी मोठी दिलासादायक बाब आहे. होल्डरचा जगातील सर्वोत्तम ऑलराऊंडर्स मध्ये समावेश होतो. भारताविरुद्ध त्याचा खूपच चांगला रेकॉर्ड आहे. त्यासाठीच त्याचा वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात समावेश करण्यात आला होता. भारताविरुद्ध 25 वनडे सामन्यात त्याने 450 धावा केल्या आहेत तसंच 23 विकेट घेतल्यात. वेस्ट इंडिज संघाचा तो मुख्य आधारस्तंभ आहे. आता वेस्ट इंडिजला त्याची कमतरता नक्कीच जाणवेल.

होल्डरला कोरोनाची लागण

जेसन होल्डर याआधीचा वनडे सामना याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताविरुद्ध खेळला होता. 6 महिन्यानंतर तो संघात पुनरागमन करणार होता. पण असं नाही झालं. पोर्ट ऑफ स्पेन मध्ये पहिल्या वनडे सामन्यात टॉसच्यावेळी वेस्ट इंडिजच कॅप्टन निकोलस पूरनने होल्डरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. सध्या तो आयसोलेशन मध्ये आहे. जेसन होल्डर कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे वेस्ट इंडिजच्या टीम मॅनेजमेंटच टेन्शन थोडं वाढलं आहे.

भारताची मालिकेत आघाडी

भारताने काल पहिला वनडे सामना 3 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी भारताने धवन, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या बळावर निर्धारित 50 षटकात 308 धावा केल्या. वेस्ट इंडिजला 305 धावाच करता आल्या. भारताकडून 97 धावांची खेळी करणार कॅप्टन शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मोहम्मद सिराजने अखेरच्या षटकात केलेली गोलंदाजी सुद्धा महत्त्वपूर्ण ठरली.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.