WI vs IND 1st Test Day 1 | पहिल्याच दिवशी टीम इंडियाची सुपर कामगिरी, वेस्ट इंडिजला दिला दणका, VIDEO

IND vs WI 1st Test Day 1 | पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने अपेक्षित सुरुवात केली आहे. रविचंद्रन अश्विनने कमालीची बॉलिंग केली. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं आहे.

WI vs IND 1st Test Day 1 | पहिल्याच दिवशी टीम इंडियाची सुपर कामगिरी, वेस्ट इंडिजला दिला दणका, VIDEO
WI vs IND 1st Test Day 1Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 8:06 AM

रोसेऊ : डॉमिनिका टेस्टमध्ये भारतीय चाहत्यांना टीम इंडियाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. टीम इंडियाने सुरुवातही तशीच केली आहे. कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी वेस्ट इंडिजचा डाव लवकर संपवला. विंडसर पार्कची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देईल असा अंदाज होता. घडलं सुद्धा तसच. रविचंद्रन अश्विनने कमालीची बॉलिंग केली.

त्याने एकट्याने 5 विकेट काढले. टीम इंडिया 12 वर्षानंतर विंडसर पार्कच्या मैदानात टेस्ट मॅच खेळण्यासाठी उतरली होती. 2011 मध्ये पहिल्यांदा या मैदानावर कसोटी सामना खेळला गेला.

याच मैदानातून भारताच्या दुसऱ्या पिढीची सुरुवात

या मैदानावर पहिला कसोटी सामना टीम इंडियाने खेळला होता. विराट कोहलीच्या टेस्ट करीयरची सुरुवात त्या टेस्ट सीरीजपासून झाली होती. आता त्यानंतर दुसरी पिढी यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन या दोघांनी याच मैदानातून टेस्ट करीयरची सुरुवात केली आहे.

वेस्ट इंडिजला काय नडलं?

वेस्ट इंडिजची टीम आता पहिल्यासारखी बळकट राहिलेली नाही. वेस्ट इंडिजचा कॅप्टन क्रेग ब्रेथवेटने टॉस जिंकला. त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी सावध सुरुवात केली होती. पण अश्विनची जबरदस्त गोलंदाजी आणि मोठे फटके खेळण्याचा मोह वेस्ट इंडिजला नडला.

लंचपर्यंत काय स्थिती होती?

ब्रेथवेट आणि तेजनरेन यांनी 31 धावांची भागीदारी करुन सुरुवात केली होती. दोघांची विकेट अश्विनने काढली. त्यानंतर रवींद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूरने यश मिळवलं. लंचपर्यंत वेस्ट इंडिजची स्थिती 4 बाद 68 होती. दुसऱ्या सेशनमध्ये स्थिती बदलली नाही. त्यावेळी टीमने 70 धावात 4 विकेट गमावले.

वेस्ट इंडिजकडून त्याचा दमदार डेब्यु

या टेस्टमध्ये टीम इंडियाकडून डेब्यु करणाऱ्या यशस्वी जैस्वाल आणि इशान किशनवर नजरा होत्या. वेस्ट इंडिजकडून 24 वर्षीय एलिक एथनेजने डेब्यु केला. तो (47) धावांची चांगली इनिंग खेळला. वेस्ट इंडिजचा डाव 150 पर्यंत पोहोचला, ते एथनेजच्या इनिंगमुळे शक्य झालं. अश्विनने 60 धावात 5 विकेट घेतल्या. 5 विकेट घेण्याची अश्विनची ही 33 वी वेळ आहे. टीम इंडियाच्या दिवसअखेर किती धावा?

वेस्ट इंडिजचा डाव 150 धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजसाठी केमार रोच आणि अल्जारी जोसेफ यांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. दोघांनी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या ओपनिंग जोडीला अडचणीत आणलं. पण त्यानंतर रोहित-यशस्वी जोडीने डाव सावरला. रोहितने नाबाद 30 धावा केल्या. यशस्वीने नाबाद 40 धावा केल्या. 21 वर्षीय यशस्वीने पहिली धाव करण्यासाठी 14 चेंडू घेतले. पण त्यानंतर कट आणि स्वीपचे चांगले फटके खेळले.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.