IND vs WI 3rd odi: शिखर धवनने टॉस जिंकला, तिसऱ्या वनडेसाठी अशी आहे playing 11
IND vs WI 3rd odi: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये आज तिसरा एकदिवसीय सामना होत आहे. तीन वनडे सामन्याच्या मालिकेत भारताने आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये आज तिसरा एकदिवसीय सामना होत आहे. तीन वनडे सामन्याच्या मालिकेत भारताने आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज भारताला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. भारताचा कॅप्टन शिखर धवनने (Shikhar Dhawan) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आजच्या सामन्यासाठी संघात एकमेव बदल केलाय. दुसऱ्या वनडेत डेब्यु करणाऱ्या आवेश खानला (Avesh Khan) बसवलय. त्याच्याजागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश केला आहे. इशान किशन, ऋतुराज गायकवाड यांना हेड कोच राहुल द्रविड संधी देतील, असं बोलल जात होतं. पण आवेश खानचा एकमेव बदल वगळता पहिल्या दोन वनडेचाच संघ कायम ठेवला आहे.
भारताकडे क्लीन स्वीपची संधी
मागच्या 15 वर्षात भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध सलग 12 वी वनडे सीरीज जिंकल्या आहेत. या 12 सीरीजपैकी जितक्या मालिका वेस्ट इंडिज मध्ये झाल्या, त्यात एक कमतरता राहिली. ही कमतरता यावेळी भरुन काढण्याची संधी आहे. भारताने पहिले दोन वनडे सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. आता भारताकडे मालिकेत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अशी कामगिरी केली, तर एक नवा इतिहास रचला जाईल.
रोहितला शिखर धवनची फलंदाजीची पद्धत पटत नाही का?
इंग्लंड विरुद्धच्या तीन वनडे सामन्यात शिखर संघर्ष करताना दिसला. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या वनडेत तो फॉर्म मध्ये परतला. त्याने 97 धावांची खेळी केली. पण शिखर धवनची फलंदाजीची पद्धत आहे, त्यावरुन मतभेद आहेत. शिखर धवन खेळपट्टीवर आल्यानंतर आधी स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतो. खेळपट्टिवर टिकून फलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पण कॅप्टन रोहित शर्मा, टीम इंडियाने आक्रमक पद्धतीने क्रिकेट खेळावे या मताचा आहे. शिखर धवनची फलंदाजीची ही पद्धत नजरेतून सुटलेली नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर 2023 मध्ये होणारी 50 षटकांची वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेऊन, निवड समितीचे सदस्य धवन बरोबर त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल चर्चा करणार आहेत. इनसाइट स्पोर्ट्ने हे वृत्त दिलं आहे.
अशी आहे भारताची प्लेइंग 11
शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा,