IND vs WI: 1000 व्या वनडेमध्ये ‘या’ खेळाडूने केलं पदार्पण, अशी आहे रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणारी भारताची प्लेइंग XI
भारताचा हा 1000 वा वनडे सामना (One thousand odi) आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री दव पडतो हे लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.
अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West Indies) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला वनडे सामना सुरु झाला आहे. भारताचा हा 1000 वा वनडे सामना (One thousand odi) आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री दव पडतो हे लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. टॉस नंतर दोन्ही टीम्सनी आपला संघ जाहीर केला आहे. भारताकडून दीपक हुड्डा (Deepak Hooda) आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. या सामन्यात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल दोघांना एकत्र संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण प्लेइंग इलेवनमध्ये कुलदीप यादवला स्थान मिळालेलं नाही. भारताकडून फिरकी गोलंदाजीची जबाबदारी युजवेंद्र चहलवर आहे.
वॉशिंग्टन सुंदरचाही संघात समावेश करण्यात आलाय. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार आहे.
दीपक हुड्डाला संधी
आज रोहित सोबत सलामीला इशान किशन उतरणार आहे. रोहित शर्माने कालच ही माहिती दिली आहे. मधल्याफळीत अष्टपैलू दीपक हुड्डाचा समावेश करण्यात आला आहे. तो अष्टपैलू खेळाडू आहे. इशान-रोहित ओपनिंगला येतील. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत फलंदाजी करतील.
केमर रोचचं विडिंजच्या संघात पुनरागमन
वेस्ट इंडिजच्या संघात वेगवान गोलंदाज केमर रोचने पुनरागमन केलं आहे. अल्जारी जोसेफ आणि अकिल हुसैन हे वेगवान गोलंदाजही संघात आहेत.
वेस्टइंडीजची प्लेइंग इलेवन – ब्रँडन किंग, शे होप, शामार्त ब्रूक्स, डेरेन ब्रावो, निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, (कॅप्टन) जेसन होल्डर, फॅबियान ऐलन, अल्जारी जोसेफ, कीमार रोच आणि अकील हुसैन
भारताची प्लेइंग इलेवन – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, वाशिंगटन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज