IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीज जिंकल्यानंतर टीम इंडियासाठी आणखी एक चांगली बातमी
भारताने वेस्ट इंडिज (IND vs WI) विरुद्धच्या 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने वनडे मालिका आधीच जिंकली आहे. आता तिसरा सामना फक्त औपचारिकता मात्र आहे.
मुंबई: भारताने वेस्ट इंडिज (IND vs WI) विरुद्धच्या 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने वनडे मालिका आधीच जिंकली आहे. आता तिसरा सामना फक्त औपचारिकता मात्र आहे. या दरम्यान टीम इंडियासाठी आणखी एक चांगली बातमी आहे. भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) फिट घोषित करण्यात आलं आहे. तो वेस्ट इंडिजला रवाना झाला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाच टी 20 सामन्यासाठी (T 20 series) जाहीर केलेल्या संघात त्याची निवड झाली होती. पण त्याच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह होतं. अखेर कुलदीप यादव फिटनेस टेस्ट मध्ये पास झाला आहे. आयपीएल नंतर कुलदीप यादवची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झाली होती. पण उजव्या हाताला दुखापत झाल्याने कुलदीप यादवला मालिकेत खेळता आलं नाही.
कोण, कुठून वेस्ट इंडिजला रवाना होणार
इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर मायदेशी परतलेले दिनेश कार्तिक, आर.अश्विन, रवी बिश्नोई, हर्षल पटेल आणि कुलदीप यादव रविवारी मुंबईतून वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाले. कुलदीपने इन्स्टाग्राम पोस्टवरुन वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात असल्याची माहिती दिली. कॅप्टन रोहित शर्मा, ऋषभ पंत इंग्लंडहून वेस्ट इंडिजला रवाना होणार आहेत. कॅप्टन विराट कोहलीला वेस्ट इंडिज विरुद्धच्या संपूर्ण सीरीजसाठीच विश्रांती देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेच्या पूर्वसंध्येला केएल राहुलला ग्रोइनची दुखापत झली होती. तो शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला गेला होता.
View this post on Instagram
कुलदीपची निवड का झाली?
NCA मध्ये तो दुखापतीमधून सावरत होता. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी तो सुद्धा भारतीय संघात दाखल होणार होता. पण त्याला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजला तो मुकणार आहे. कुलदीप यादवने आयपीएल मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या सीरीजसाठी निवड करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली होती. पण त्याला पुरेशी संधी मिळाली नव्हती. आयपीएल मध्ये मात्र त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली.