IND vs WI, 1st ODI: वेस्ट इंडिजला नमवून भारताने पहिली वनडे जिंकली
वेस्ट इंडिज विरुद्धच्या या मालिकेद्वारे रोहित शर्माची (Rohit sharma) कर्णधार म्हणून नवीन इनिंग सुरु होत आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच वनडे मालिका आहे.
अहमदाबाद: कर्णधार म्हणून रोहित शर्माने (Rohit sharma) विजयी सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर (India vs west indies) सहा गडी राखून विजय मिळवला. सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताने सहज विजय मिळवला असं दिसतं असलं तरी, मध्ये गडबड झाली होती. रोहित शर्मा बाद (60) झाल्यानंतर विराट, (8) इशान किशन (Ishan kishan) (28) आणि ऋषभ पंत (11) ठराविक धावांच्या अंतराने बाद झाले. बिनबाद 84 अशा स्थितीमध्ये असलेल्या भारताची चार बाद 116 अशी स्थिती झाली होती. पण त्यावेळी सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डाने डाव सावरला व भारताला विजय लक्ष्यापर्यंत पोहोचवले. पहिलाच सामना खेळणाऱ्या दीपक हुड्डाने चांगली फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि इशान किशनने भारताला चांगली सुरुवात करुन दिली.
वेस्टइंडीजची प्लेइंग इलेवन – ब्रँडन किंग, शे होप, शामार्त ब्रूक्स, डेरेन ब्रावो, निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, (कॅप्टन) जेसन होल्डर, फॅबियान ऐलन, अल्जारी जोसेफ, कीमार रोच आणि अकील हुसैन
भारताची प्लेइंग इलेवन – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, वाशिंगटन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज