WI vs IND T20I Series 2023 | फक्त ‘या’ एका कारणामुळे सिलेक्टर्सनी Rinku Singh ला टीममध्ये निवडलं नाही?
WI vs IND T20I Series 2023 | रिंकू सिंहची टीममध्ये निवड झाली नाही. त्यामुळे नेटीझन्सनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 मालिकेसाठी काल टीम इंडिया जाहीर झाली.
मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 मालिकेसाठी बुधवारी टीम इंडियाची घोषणा झाली. या टीममधून एक नाव गायब आहे. त्याचं सर्वानाच आश्चर्य वाटलं. विडिंज विरुद्ध T20 मालिकेसाठी निवडलेल्या टीममध्ये रिंकू सिंहच नाव नाहीय. IPL 2023 मध्ये रिंकू सिंहने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. त्याने लास्ट ओव्हरमध्ये 5 चेंडूत 5 सिक्स मारुन कोलकात नाइट रायडर्सला सामना जिंकून दिला होता. त्यामुळे रिंकू सिंहची वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीममध्ये निवड होईल, अशी सर्वाना अपेक्षा होती.
टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध 5 T20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. हार्दिक पांड्याकडे टीमच नेतृत्व आहे. रिंकू सिंहची टीममध्ये निवड झाली नाही. त्यामुळे नेटीझन्सनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला.
याच कारणामुळे रिंकू सिंहची टीममध्ये निवड झाली नाही का?
फक्त रिंकू सिंहच नाही, ऋतुराज गायकवाड आणि जितेश शर्मा या दोघांची सुद्धा T20 सीरीजसाठी टीममध्ये निवड झालेली नाही. रिंकूने यंदाच्या IPL सीजमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. आता प्रश्न हा निर्माण होतो की, मग रिंकूची टीममध्ये निवड का झाली नाही? रिंकू सिंह सध्या बंगळुरुत NCA मध्ये आहे. तिथे तो त्याच्या फिटनेसवर मेहनत घेतोय. रिंकू सिंहला दुखपात झाल्यामुळे तो 100 टक्के फिट नसावा, अशी सुद्धा एक शक्यता आहे. याच कारणामुळे रिंकू सिंहची टीममध्ये निवड झालेली नसावी.
? JUST IN: Few fresh faces in India’s T20I squad for the West Indies tour!
More ?https://t.co/8Za4WyCcoZ
— ICC (@ICC) July 5, 2023
IPL 2023 एकूण किती धावा केल्या?
IPL 2023 च्या सीजनमध्ये रिंकू सिंह KKR कडून एकूण 14 सामने खेळला. त्याने 474 धावा केल्या. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करुन दाखवली. यश दयालच्या लास्ट ओव्हरमध्ये त्याने 5 चेंडूत 5 सिक्स मारुन कोलकाता टीमला विजय मिळवून दिला होता. विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया
हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.