Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM 1st ODI: Deepak Chahar चं जबरदस्त कमबॅक, झिम्बाब्वेला हादरवून सोडलं

IND vs ZIM 1st ODI: या सीरीज मधल्या कामगिरीच्या आधारावरच त्याच्यासाठी आशिया कप (Asia Cup) त्यानंतर आगामी टी 20 वर्ल्ड कपचे दरवाजे उघडू शकतात. दीपक चाहरकडून चाहत्यांना आणि बीसीसीआयला (BCCI) भरपूर अपेक्षा आहेत.

IND vs ZIM 1st ODI: Deepak Chahar चं जबरदस्त कमबॅक, झिम्बाब्वेला हादरवून सोडलं
Deepak chaharImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 3:22 PM

मुंबई: पुनरागमन करताना छाप उमटवण सोप नसतं. मध्ये एक मोठा ब्रेक असतो. फार कमी खेळाडू दमदार पुनरागमन करतात. अशाच खेळाडूंपैकी एक आहे, दीपक चाहर. (Deepak Chahar) तब्बल 188 दिवसांनी म्हणजे 6 महिन्याच्या गॅप नंतर दीपक चाहर आज मैदानात परतला. आपला शेवटचा वनडे सामना तो 11 फेब्रुवारीला खेळला होता. दीपक चाहरसाठी ही सीरीज महत्त्वाची आहे. कारण या सीरीज मधल्या कामगिरीच्या आधारावरच त्याच्यासाठी आशिया कप (Asia Cup) त्यानंतर आगामी टी 20 वर्ल्ड कपचे दरवाजे उघडू शकतात. दीपक चाहरकडून चाहत्यांना आणि बीसीसीआयला (BCCI) भरपूर अपेक्षा आहेत. आज 6 महिन्यानंतर झिम्बाब्वे विरुद्ध पहिला वनडे सामना खेळणाऱ्या दीपकने निराशही केलं नाही.

दीपक चाहरचा भन्नाट स्पेल

पावरप्लेमध्ये विकेट काढणं ही दीपक चाहरची खासियत आहे. आज त्याने आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी केली. आज झिम्बाब्वेने सावध सुरुवात केली होती. बिनबाद 24 धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र दीपक चाहरच तांडव सुरु झालं. त्याच्या स्विंग होणाऱ्या चेंडूंसमोर झिम्बाब्वेचे सलामीवीर टिकू शकले नाही. सर्वप्रथम त्याने इनोसंट कायाला माघारी धाडलं. 4 धावांवर खेळणाऱ्या कायाला विकेटकीपर संजू सॅमसनकरवी झेलबाद केलं. त्यानंतर दुसरा सलामीवीर ताडिवानाशे मारुमानीला 8 धावांवर आऊट केला. चाहरने त्याला सुद्धा सॅमसनकरवी झेलबाद केलं. 8.1 षटकात झिम्बाब्वेची स्थिती 26/2 करुन टाकली. त्यानंतर वेस्ली मधवीरेला अवघ्या 5 धावांवर पायचीत पकडलं. झिम्बाब्वेची अवस्था 4 बाद 31 करुन टाकली.

आयपीएल मधला दुसरा महागडा खेळाडू

दीपक चाहरने आतापर्यंत 7 षटकात 27 धावा देऊन 3 विकेट घेतल्या आहेत. अपेक्षेनुसार त्याने कमबॅक केलं आहे. झिम्बाब्वे सीरीजआधी दीपक चाहर भारतासाठी 7 वनडे सामने खेळला आहे. यात 5 डावात 2 अर्धशतकासह त्याने 179 धावा केल्यात. त्याशिवाय 10 विकेटही घेतल्यात. दीपक चाहर आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शन मधला दुसरा महागडा खेळाडू होता. पण दुखापतीमुळे तो आयपीएलचा पूर्ण सीजन खेळू शकला नाही.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.