IND vs ZIM: भारताविरुद्ध सीरीजसाठी झिम्बाब्वेचा संघ जाहीर, दमदार गोलंदाज आणि दिग्गज कर्णधार बाहेर
IND vs ZIM: झिम्बाब्वेच्या संघाला कमकुवत समजण्याची चूक भारताने करु नये. या संघाने नुकतच बांगलादेश विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यांनी बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका जिंकली.
मुंबई: झिम्बाब्वेच्या संघाला कमकुवत समजण्याची चूक भारताने करु नये. या संघाने नुकतच बांगलादेश विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यांनी बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका जिंकली. झिम्बाब्वेचा संघ आता पुढची सीरीज भारताविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे या महिन्यात तीन मॅचची वनडे सीरीज खेळणार आहेत. टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे. आता यजमान झिम्बाब्वेने आपला संघ जाहीर केला आहे. टीमला आपला नियमित कर्णधार क्रेग इरविन शिवाय मैदानावर उतराव लागणार आहे. संघाचं नेतृत्व रेजिस चकाबवाकडे सोपवण्यात आलं आहे.
कॅप्टन आणि दमदार गोलंदाज बाहेर
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने गुरुवारी 11 ऑगस्टला या सीरीजसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. झिम्बाब्वेला कॅप्टन इरविन आणि वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी यांच्याशिवाय मैदानात उतरावं लागणार आहे. इरविन अजून पर्यंत हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमधून सावरलेला नाही. मुजरबानीला ग्रोइन दुखापत आहे. त्यामुळे हे दोघे भारताविरुद्धच्या सीरीज मध्ये खेळू शकणार नाहीत. झिम्बाब्वे क्रिकेटने एका प्रेस रिलीजद्वारे निवडलेला संघ, दुखापतग्रस्त खेळाडू आणि नव्या कर्णधाराबाबत माहिती दिलीय.
Zimbabwe name squad for ODI series against India
Details ?https://t.co/cDteJIV5AZ pic.twitter.com/5tm3ecV9e2
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) August 11, 2022
बांगलादेश विरुद्ध झळकावलं शतक
झिम्बाब्वेने अलीकडेच बांगलादेशला पहिल्या टी 20 सीरीज मध्ये हरवलं. त्यानंतर वनडे सीरीज मध्येही मात केली. टी 20 सीरीज मध्ये इरविन कॅप्टन होता. त्यानंतर इरविनला दुखापत झाली. चकाबवाने वनडे सीरीज मध्ये संघाचं नेतृत्व केलं. त्याने संघाला 2-1 ने विजय मिळवून दिला. चकाबवाने दुसऱ्या वनडे मध्ये शतक झळकावलं. भारत आणि झिम्बाब्वे मध्ये तीन वनडे सीरीजचे सामने 18, 20 आणि 22 ऑगस्टला खेळले जाणार आहेत. तिन्ही सामने झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात होतील.
IND vs ZIM: झिम्बाब्वे संघ
रेजिस चकाबवा (कॅप्टन), रायन बर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जोंगवे, इनोसेंट काया, ताकुदज्वानाशे कॅटानो, क्लाइव मदांडे, वेस्ली मधेवेरे, तदीवानाशे मारुमनी, जॉन मसारा, टोनी मुन्योंगा, रिचर्ड नगारवा, विक्टर न्याची, सिकंदर रजा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड टिरिपानो.