IND vs ZIM: ‘त्या’ दोघांवर विशेष नजर ठेवा, सिलेक्टर्सकडून VVS Laxman यांना विनंती

IND vs ZIM: भारत आणि झिम्बाब्वे मधील तीन वनडे सामन्याच्या सीरीजला उद्यापासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याजागी व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

IND vs ZIM: 'त्या' दोघांवर विशेष नजर ठेवा, सिलेक्टर्सकडून VVS Laxman यांना विनंती
vvs laxmanImage Credit source: File photo
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 1:44 PM

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे  (IND vs ZIM) मधील तीन वनडे सामन्याच्या सीरीजला उद्यापासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याजागी व्ही.व्ही.एस लक्ष्मण (VVS Laxman) यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय निवड समिती सदस्यांनी व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्याकडे आणखी एक जबाबदारी दिली आहे. त्यांनी केएल राहुल (KL Rahul) आणि दीपक चाहरच्या फिटनेसवर बारीक लक्ष ठेवण्याची विनंती केली आहे. मोठ्या दुखापती नंतर दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करत आहेत. आशिया कप 2022 आणि त्यानंतर काही महिन्यांनी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी दोघे 100 टक्के फिट आहेत का? ते राष्ट्रीय निवड समितीला जाणून घ्यायच आहे.

त्यांनी पूर्णपणे फिट असावं, एवढच आमचं म्हणणं आहे

“राहुल आणि चाहर भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग आहेत. ते पूर्णपणे फिट असले पाहिजेत. आम्ही लक्ष्मण यांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची विनंती केली आहे. राहुलचा आशिया कप संघात समावेश करण्यात आलाय. चाहरही रडारवर आहे. त्यांनी पूर्णपणे फिट असावं, एवढच आमचं म्हणण आहे” असं एका निवड समिती सदस्याने इनसाइड स्पोर्टला सांगितलं.

सिलेक्टर्सनी जी विनंती केलीय, त्याला अर्थ आहे

सिलेक्टर्सनी जी विनंती केलीय, त्याला अर्थ आहे. कारण दोन्ही क्रिकेटपटू एका दीर्घ काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहेत. केएल राहुलवर हर्णियाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर त्याला कोविडची बाधा झाली होती. आयपीएल झाल्यानंतर तो एकही आंतरराष्ट्रीय मालिका खेळलेला नाही. दीपक चाहरलाही आधी हॅमस्ट्रिंग मग पाठिची दुखापत झाली. तो आधी आयपीएलच्या संपूर्ण सीजनला मुकला. त्यानंतरही तीन ते चार आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये खेळू शकला नाही. अशा स्थितीत या दोन खेळाडूंचा फिटनेस ठाऊक असणं, खूप महत्त्वाच आहे.

टीम इंडियात अलीकडेच एक बदल

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियात अलीकडेच एक बदल करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदचा संघात समावेश करण्यात आला. वॉशिंग्टन सुंदरची भारतीय संघात झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली होती. पण त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्याजागी शाहबाज अहमदची निवड करण्यात आली.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.