IPL 2023: धोनी समोरच एक टॉप ऑलराऊंडर क्रिकेटपटू लागला KKR च्या गळाला
IPL 2023: CSK काहीच करु शकली नाही.

मुंबई: पुढच्यावर्षी IPL च विजेतेपद मिळवण्यासाठी वेगवेगळ्या टीम्सनी आतापासूनच रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या टीम्समध्ये खेळाडूंच ट्रेडिग सुरु आहे. आयपीएल 2023 ची ट्रेडिग विंडो बंद होण्याआधी एक महत्त्वाचा ऑलराऊंडर खेळाडू कोलकाता नाइट रायडर्सच्या गळाला लागला आहे. निश्चितच त्यामुळे केकेआरचा फायदा होणार आहे. या ऑलराऊंडरमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे.
दिल्लीकडून केलं ट्रेडिग
कोलकाता नाइट रायडर्स शार्दुल ठाकूरचा आपल्या टीममध्ये समावेश करण्यात यशस्वी ठरली आहे. आयपीएल 2023 ची ट्रेडिग विंडो बंद होण्याआधी केकेआरने शार्दुलला दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रेड केलय. शार्दुलला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्स , गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स प्रयत्नशील होते. शार्दुल याआधी CSK कडून खेळायचा.
शार्दुल ठाकूरला किती कोटीला विकत घेतलेलं?
शार्दुल ठाकूर सध्या टीम इंडियासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तो वनडे टीमचा भाग आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने शार्दुलला 10.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. पुढच्या 2023 च्या आयपीएलमध्ये तो केकेआरच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.
किती विकेट घेतल्या?
आयपीएल 2022 मध्ये शार्दुलने 14 मॅचमध्ये एकूण 15 विकेट घेतले होते. त्याची इकॉनमी 9.79 ची होती. त्याने 120 धावा केल्या. शार्दुलचा स्ट्राइक रेट 138 चा होता.
ट्रेडमधून केकेआरच्या टीममध्ये आलेला तिसरा खेळाडू
मंगळवारी ट्रेडिग विंडो बंद होणार आहे. त्याआधी केकेआरच्या गोटात हालचाल वाढली आहे. ट्रेडच्या माध्यमातून केकेआरमध्ये दाखल होणारा शार्दुल तिसरा खेळाडू आहे. याआधी लॉकी फर्ग्युसन आणि रहमतुल्लाह गुरबाजला केकेआरने गुजरात टायटन्सकडून ट्रेड केलं होतं.