Rohit sharma ला कॅप्टनशिप सोडावी लागणार, BCCI सूत्रांची महत्त्वाची माहिती

BCCI चं ठरलय, भविष्याच्या दृष्टीने नव्या बदलांसाठी पावलं टाकली जातील.

Rohit sharma ला कॅप्टनशिप सोडावी लागणार, BCCI सूत्रांची महत्त्वाची माहिती
Rohit sharmaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 3:48 PM

मुंबई: T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव झाला. तेव्हापासून सातत्याने कॅप्टन बदलण्याची मागणी होत आहे. पुढचा टी 20 वर्ल्ड कप दोनवर्षांनी 2024 मध्ये होणार आहे. त्यावेळी रोहित शर्माच वय 37 वर्ष असेल, त्यामुळे आतापासून टी 20 ची धुरा नव्या कर्णधाराकडे सोपवावी, असा भारतीय क्रिकेटमध्ये मतप्रवाह आहे. न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीजसाठी हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवण्यात आलय.

BCCI चं आधीच ठरलय

त्यालाच कायमस्वरुपी कर्णधार बनवण्याची मागणी होत आहे. आता निवड समिती सदस्यांमध्ये यावर एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे रोहित शर्माला टी 20 चं कर्णधारपद गमवाव लागणार आहे. जानेवारीत होणाऱ्या श्रींलेकविरुद्धच्या तीन टी 20 सामन्याच्या सीरीजपूर्वी हार्दिक पंड्याची कायमस्वरुपी टी 20 कर्णधारपदी नियुक्तीची घोषणा होईल. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा कायम राहिलं, असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं.

वाढतं वय रोहितच्या आड येणार

“एकमत झालं असून आता बदलाची वेळ आलीय. रोहित शर्मा बरच योगदान देऊ शकतो. पण तो आता तितका तरुण राहिलेला नाही. 2024 टी 20 वर्ल्ड कपसाठी आतापासून तयारी करावी लागेल. हार्दिक त्यासाठी एकदम फिट आहे. सिलेक्टर्स भेटून पुढच्या टी 20 सीरीजआधी कॅप्टन म्हणून हार्दिकच्या नावाची घोषणा करतील” असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं.

रवी शास्त्रींच म्हणण काय?

“टी 20 क्रिकेटमध्ये नवीन कॅप्टन निवडण्यात कुठलाही धोका नाहीय. सध्या क्रिकेटच प्रमाण बघता, एका खेळाडूसाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणं सोप नाहीय. रोहित कसोटी आणि वनडेमध्ये नेतृत्व करत असेल, तर टी 20 साठी नवीन कॅप्टन निवडण्यात काहीही धोका नाहीय. हार्दिक पंड्या तो कॅप्टन असेल, तरी चालेल” असं रवी शास्त्री म्हणाले.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.