दीपक चाहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या भारत विरुद्ध श्रीलंकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात केली आहे.

दीपक चाहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात
दीपक चाहर-भुवनेश्वर कुमार
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 11:49 PM

कोलंबो : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या भारत विरुद्ध श्रीलंकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात केली आहे. दीपक चाहरने 82 चेंडूत 69 धावांची मॅच विनिंग खेळी साकारली. तर सूर्यकुमार यादवनेदेखील (53) अर्धशतकी खेळी करत आपलं योगदान दिलं. सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहरच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेने दिलेलं 275 धावांचं आव्हान 3 विकेट्स आणि 5 चेंडू राखून पूर्ण केलं. या विजयासह भारताने उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूंनी श्रीलंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय मिळवला होता. (India defeated Sri Lanka in 2nd ODI by 3 wickets)

श्रीलंकन फलंदाजांनी भारताला 276 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची आज खराब सुरुवात झाली. आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ (12) तिसऱ्याच षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ इशान किशन (1), शिखर धवन (29), मनिष पांडे (37) हार्दिक पंड्या (0) एका मागोमाग एक ठराविक अंतराने बाद होत गेले. परंतु सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरली होती. त्याने 42 चेंडूत 52 धावा फटकावत एकदिवसीय कारकीर्दीतलं पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर आलेल्या कृणाल पंड्याने 35 धावांचं योगदान दिलं. कृणाल बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र दीपक चाहरने हाती घेतली. सुरुवातीला संयमी खेळी करत त्याने डावाला आकार दिला. त्यानंतर गरज पडेल तेव्हा फटकेबाजी करत 82 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार फटकावला. भुवनेश्वर कुमारने (19) त्याला अखेरपर्यंत चांगली साथ दिली.

तत्पूर्वी श्रीलंकेचे सलामीवीर फलंदाज अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी उत्कृष्ठ सुरुवात करत 77 धावांची भागिदारी रचली. त्याचवेळी 14 व्या षटकात गोलंदाजीसाठी मैदानात आलेल्या चहलने दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर मिनोद आणि राजपक्षा यांना बाद करत भारताला दोन विकेट्स मिळवून दिल्या. त्यानंतर फर्नांडो (50) आणि धनंजया (32) या दोन सेट फलंदाजाच्या विकेट भुवनेश्वर कुमार आणि दिपक चहारने घेत. भारताची बाजू आणखी मजबूत केली. त्यानंतर असालंका याच्या 65 आणि करुणारत्नेच्या नाबाद 44 धावांच्या जोरावर श्रीलंकेने 275 धावापर्यंत मजल मारली. भारताला आता विजयासाठी 276 धावांची गरज होती. हे आव्हान भारताने शेवटच्या षटकात पूर्ण केलं.

इतर बातम्या

भारतीय गोलंदाजाची निराशाजनक कामगिरी कायम, झिम्बाब्वे, बांग्लादेश पेक्षाही खराब गोलंदाजीचे आकडे

IND vs ENG : इंग्लंडमध्ये विराटसह भारताच्या तीन खेळाडूंना दुखापत, सराव सामन्यातूनही माघार

IND vs SL : सहा वर्षात पहिल्यांदाच नो बॉल, भारताच्या हुकमी गोलंदाजाची छोटी चूक, मोठा विक्रम तुटला

(India defeated Sri Lanka in 2nd ODI by 3 wickets, Deepak Chahar, Suryakumar Yadav Fifties)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.