India vs Leicestershire: वॉर्म अप मॅच मध्ये ढोल-नगाडे वाजवून स्वागत, पण टीम इंडिया अडचणीत, पहा VIDEO
India vs Leicestershire: पहिली वॉर्म अप मॅच (Warm up Match) खेळणाऱ्या टीम इंडियाचं देशी अंदाजात जोरदार स्वागत करण्यात आलं.
मुंबई: एक जुलैपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याआधी भारत आणि लीसेस्टरशायर (India vs Leicestershire) मध्ये आज पासून चार दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर पहिली वॉर्म अप मॅच (Warm up Match) खेळणाऱ्या टीम इंडियाचं देशी अंदाजात जोरदार स्वागत करण्यात आलं. ढोल-नगाडे वाजवून पंजाबी स्टाइलने स्वागत करण्यात आलं. भारतीय संस्कृतीनुसार, कलाकारांनी डान्स करुन स्वागत केलं. बीसीसीआयने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कलाकारांनी भारतीय वेशभूषा परिधान करुन नृत्य केलं. जल्लोषात भारतीय खेळाडूंच स्वागत केलं.
भारतीय संघ अडचणीत
टीम इंडियाच जोरदार स्वागत झालं असलं, तरी दौऱ्याची खराब सुरुवात झाली आहे. सराव सामन्यात पहिल्याच दिवशी भारत अडचणीत आहे. पाच बाद 90 अशी स्थिती आहे. रोहित शर्मा (25), शुभमन गिल (21), हनुमा विहारी (3), श्रेयस अय्यर (०) आणि रवींद्र जाडेजा (13) असे पाच विकेट गेलेत. विराट कोहली आणि श्रीकर भरत खेळपट्टीवर आहे.
प्रसिद्ध कृष्णाने काढली एक विकेट
रोमन वॉकर भेदक गोलंदाजी करतोय. त्याने आतापर्यंत तीन विकेट घेतल्या आहेत. हनुमा विहारी, रवींद्र जाडेजा आणि रोहित शर्मा या तीन विकेट त्याने काढल्या. जसप्रीत बुमराहला अजून यश मिळालेलं नाही. पण प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट काढला. त्याने श्रेयस अय्यरला पंतकरवी झेलबाद केलं.
That is some welcome for a practice game. Leicester is buzzing. #TeamIndia pic.twitter.com/uI5R6mafFV
— BCCI (@BCCI) June 23, 2022
चार भारतीय खेळाडू लीसेस्टरशायर मधून खेळतायत
टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना सराव मिळाला पाहिजे, यासाठी भारताच्या काही खेळाडुंचा लीसेस्टरशायरच्या संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसाय, इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि लीसेस्टरशायरने मिळून हा निर्णय घेतला आहे. या सराव सामन्यात दोन्ही संघांचे प्रत्येकी 13 खेळाडू खेळत आहेत. चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, प्रसिद्ध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह हे लीसेस्टरशायरच्या टीम मधून खेळतायत.