विराट, भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये, तुला माझ्याकडून शुभेच्छा : हरभजन सिंग

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी शुभेच्छा देत काही महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत.

विराट, भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये, तुला माझ्याकडून शुभेच्छा : हरभजन सिंग
harbhajan singh on wtc final
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 4:10 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्याकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले आहे. भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगही (Harbhajan Singh) या सामन्याबाबत बराच उत्सुक असून त्याने संघाला शुभेच्छा देत कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ‘भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये, तुला माझ्याकडून शुभेच्छा’ असा भावनिक संदेश दिला आहे. सोबतच हरभजनने सामन्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत भारतीय संघाला काही सल्ले दिले आहेत. (India has to Win ICC World Test Championship and Bring WTC Final Trophy to home says Harbhajan Singh to Virat Kohli)

हरभजनने भारतीय संघाकडे असणारे गोलंदाज सध्या संघाची ताकद असल्याचं सांगितलं. हरभजनच्या मते दोन स्पिनर खेळवणे भारताला फायद्याचे ठरु शकते. त्याने कर्णधार विराट कोहलीला तसा सल्लाही दिला. दरम्यान भारताने अंतिम 15 मध्ये दोन फिरकीपटूंना संधी याआधीच दिली आहे. परंतू अंतिम 11 मध्ये मैदानावर दोघांनाही उतरवेल का? याबाबत साशंकता आहे.

साऊदम्पटनचं मैदान आणि फिरकीपटू

हरभजनने अंतिम सामन्यात फिरकीपटूंच महत्त्व सांगताना मैदानाच्य खेळपट्टीचे उदाहरण दिले. त्याच्या मते भारताने रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि रवीचंद्रन आश्विन (R Ashwin) अशा दोन्ही फिरकीपटूंना खेळवणे भारतासाठी फायद्याचे ठरेल. कारण याआधी भारत 2014 आणि 2018 मध्ये याच मैदानात इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा इंग्लंडच्या मोईन अलीने 2014 मध्ये  8 आणि 2018 मध्ये 9 विकेट्स चटकावल्या होत्या. ज्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला होता. हे उदाहरण देत फिरकीपटूंचे महत्त्व पटवून दिले. सोबतच जाडेजा हा बोलिंगसह बॅटिंगमध्येही संघाला फायदेशीर असल्याचं हरभजन म्हणाला.

‘इशांतच्या जागी सिराजला संधी द्यावी’

सध्या भारतीय संघाकडे गोलंदाजाची फौज असल्याने अंतिम 11 मध्ये कोणाला खेळवायचे हा प्रश्न आहे. प्रत्येकजण आपआपला तर्क लावत असून हरभजनने त्याच्या मते जाडेजा आणि आश्विनसह जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि मोहम्मद शमी (Mohammad  Shami) यांना खेळवावे. इशांतच्या जागी सिराजला खेळवण्याबद्दल हरभजन म्हणाला, ‘इशांत शर्माने देशाची खूप सेवा केलीय. तो देशासाठी 100 टेस्ट मॅच खेळला आहे. पण आता सिराजची वेळ आली आहे. तोही फॉर्ममध्ये आहे. त्याला बोलिंग करताना पाहणं, वेगळं असेल’

‘हा विजय एखाद्या दागिन्याप्रमाणे असेल’

भारतीय संघासह विराटला शुभेच्छा देताना हरभजन म्हणाला, ”कोणत्याही फॉरमॅटमध्ये पहिल्यांदा एखादा संघ वर्ल्ड चॅम्पियन बनतो तेव्हा त्यावेळच्या फिलिंग खूप खास असतात. विराटने जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना जर विराटसेनेने जिंकला तर येणाऱ्या कित्येक पिढींना ते भूषणावह असणार आहे. माझ्या शुभेच्छा विराट कोहली आणि संपूर्ण भारतीय संघासोबत आहेत. विराट तू जेव्हा भारतात येशील तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊनच ये” सध्या कोरोनाच्या संकटामुळे भारतातूनच घरी बसून संघाला सपोर्ट करत असल्याचंही हरभजनने सांगितलं.

हे ही वाचा :

WTC अंतिम सामन्यात कोण जिंकणार?, युवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव

भारतीय संघाजवळ कुठेही जाऊन कुणालाही पाणी पाजायची ताकद : गौतम गंभीर

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज

(India has to Win ICC World Test Championship and Bring WTC Final Trophy to home says Harbhajan Singh to Virat Kohli)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.