WTC Points Table : शेजाऱ्यांमुळे भारताचं नुकसान, NZ ला हरवूनही गुणतालिकेत पहिलं स्थान नाहीच

भारतीय संघाने मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. टीम इंडियाने मुंबई कसोटी 372 धावांनी जिंकून मालिका 1-0 अशी खिशात घातली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 मधील भारताचा हा पहिला मालिका विजय आहे.

WTC Points Table : शेजाऱ्यांमुळे भारताचं नुकसान, NZ ला हरवूनही गुणतालिकेत पहिलं स्थान नाहीच
Team India
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 2:41 PM

मुंबई : भारतीय संघाने मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. टीम इंडियाने मुंबई कसोटी 372 धावांनी जिंकून मालिका 1-0 अशी खिशात घातली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 मधील भारताचा हा पहिला मालिका विजय आहे. या निकालानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही बदल झाला आहे. पण भारताच्या स्थितीवर फारसा परिणाम झाला नाही. चला तर मग जाणून घेऊया कसोटी मालिकेत न्यूझीलंडला पराभूत करून भारताने WTC गुणतालिकेत किती कमाई केली आणि आता टीम इंडिया कोणत्या स्थानावर आहे? तसेच कोणता संघ WTC च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल आहे हे देखील जाणून घेऊया. (India is on 3rd place in ICC WTC points table after defeating new zealand in series)

मुंबई कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाचे 42 गुण झाले आहेत. तसेच त्यांची विजयी टक्केवारी आता 58.33 इतकी आहे. यासह भारत पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताने आतापर्यंत सहा कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी तीन जिंकले आहेत, दोन ड्रॉ केले आहेत आणि एक सामना गमावला आहे. भारताने WTC मध्ये दोन कसोटी मालिका खेळल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा निर्णय अद्याप झालेला नाही, मात्र या मालिकेत भारत 2-1 ने पुढे आहे. तर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवला आहे.

श्रीलंका अव्वल

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत श्रीलंका सध्या अव्वल स्थानावर आहे. श्रीलंकेने दोन कसोटी सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. त्यांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. श्रीलंका 24 गुण आणि 100 टक्के सरासरीसह अव्वल स्थानावर आहे. गुणतालिकेतील संघांचे स्थान जिंकलेल्या गुणांच्या आधारे ठरवले जात नाही. भारत आणि श्रीलंकेच्या बाबतीत. भारताचे 42 गुण असले तरी टिम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसमुळे काही मालिका रद्द झाल्यामुळे आयसीसीने यावेळी सुरुवातीपासून पॉइंट्सची टक्केवारी प्रणाली लागू केली आहे. या आधारे विजयासाठी 100 टक्के गुण दिले जातील, तर सामना बरोबरीत सुटल्यास 50 टक्के गुण आणि सामना अनिर्णित झाल्यास दोन्ही संघांना 33.33 टक्के गुण मिळतील. अशा परिस्थितीत एखादा संघ कमी-जास्त सामने खेळतो, कमकुवत संघाविरुद्ध खेळतो किंवा बलाढ्य संघाविरुद्ध खेळतो, सर्वांना समान गुण दिले जातील.

पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर

कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत पाकिस्तान सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी तीन कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी दोन जिंकले आणि एक गमावला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात 24 गुण आणि विजयी टक्केवारी 66.66 अशी आहे. पाकिस्तान सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.

इंग्लंड चौथ्या स्थानी

उर्वरित संघांबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंड एक विजय, एक अनिर्णित आणि दोन पराभवांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे 14 गुण आणि 29.17 टक्के गुण आहेत. एक विजय आणि तीन पराभवांसह 12 गुण आणि 25 टक्के गुणांसह वेस्ट इंडिज पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे चार गुण आणि 16.66 टक्के गुण आहेत आणि ते सहाव्या क्रमांकावर आहे.

इतर बातम्या

IND vs NZ : टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा वचपा, किवी संघाने हिरावलेलं पहिलं स्थान परत मिळवलं

ND vs NZ, 2nd Test : मयंकचं शतक, अश्विन-जयंतचे ‘चौकार’, मुंबई कसोटीत भारताचा 372 धावानी शानदार विजय

IND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं?

(India is on 3rd place in ICC WTC points table after defeating new zealand in series)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.