IND vs ENG: T20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवाला कोण जबाबदार? समजून घ्या 4 पॉइंट्समधून

IND vs ENG: टीम इंडियाचा इतका दारुण पराभव कसा झाला, जाणून घ्या.

IND vs ENG: T20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवाला कोण जबाबदार? समजून घ्या 4 पॉइंट्समधून
Rohit-sharmaImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 4:59 PM

एडिलेड: टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याकडून कोट्यवधी चाहत्यांना भरपूर अपेक्षा होत्या. पण नेहमी होतं, तसच घडलं. सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा अत्यंत दारुण पराभव झाला. इंग्लंडच्या टीमने मोठा विजय मिळवून दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. आता रविवारी मेलबर्नवर इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये फायनल खेळली जाईल.

इंग्लंडकडून एलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा फटकावल्या. कॅप्टन जोस बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा फटकावल्या. इंग्लंडने चार ओव्हर आणि 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. भारताच्या पराभवाची काय कारण आहेत? ते जाणून घेऊया.

टीम इंडियाची ओपनिंग पार्टनरशिप सुपर 12 मध्ये अपयशी ठरली होती. सेमीफायनलमध्येही हे चित्र बदललं नाही. इंग्लंड विरुद्ध रोहित-राहुलची जोडी 9 रन्सवर आऊट झाली. टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळू शकली नाही. पावरप्लेमध्ये फक्त 38 धावा झाल्या.

कॅप्टन रोहित शर्माची बॅट संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये तळपली नाही. सेमीफायनलमध्येही हेच दृश्य होतं. रोहितने 28 चेंडूत 27 धावा केल्या. आज सूर्यकुमार यादव 10 चेंडूत 14 रन्सवर आऊट झाला.

सुपर-12 मध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप सिंह आणि भुवनेश्वर कुमारने सेमीफायनलमध्ये निराश केलं. दोघं पावरप्लेमध्ये ना विकेट घेऊ शकले. ना धावा रोखल्या. भुवनेश्वरचा इकॉनमी रेट प्रतिओव्हर 10 पेक्षा जास्त होता. शमी, अश्विन आणि पंड्याचा प्रति ओव्हर इकॉनमी रेट 10 पेक्षा जास्त होता.

टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चं सिलेक्शन सुद्धा पराभवाच कारण ठरलं. विकेट टेकिंग स्पिनरला संधी दिली नाही. अक्षर पटेलला संधी दिली. पण तो फ्लॉप ठरला. युजवेंद्र चहलला संपूर्ण स्पर्धेत खेळवलं नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.