जेव्हा इंग्लंडला पोहोचताच टीम इंडियाने लाज आणली, शून्यावर 4 विकेट्स, पदार्पणातच गोलंदाजाचा तुफानी मारा

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. याआधीही अनेकदा इंग्लंडचा दौरा भारतीय संघाने केला आहे. पण ही कामगिरी आतापर्यंतची सर्वात खराब सुरुवात होती.

जेव्हा इंग्लंडला पोहोचताच टीम इंडियाने लाज आणली, शून्यावर 4 विकेट्स, पदार्पणातच गोलंदाजाचा तुफानी मारा
कसोटी सामना (प्रतिकात्मक फोटो)
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 11:59 AM

हेडिंग्‍ले : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final) अंतिम सामना खेळल्यानंतर इंग्लंडसोबत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याआधीही अनेकदा भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आहे. अशाच एका दौऱ्यातील एका सामन्यात भारतीय संघावर मोठी नामुष्की ओढवली होती. भारतीय संघाला शून्यावर एक-दोन नाही तर चार विकेट्स गमवावे लागले होते . विशेष म्हणजे भारतीय संघाची ही हालत करणारा गोलंदाज ही आपला पहिलाच सामना खेळत होता. (India Lost badly against England in First Test at England Tour)

तर, हा सामना आजच्याच दिवशी म्हणजे 7 जून 1952 रोजी खेळवला गेला होता. हेडिंग्‍लेच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात विजय हजारे भारताचे कर्णधार होते. सामन्यात भारतीय संघाने आधी फलंदाजी करत 293 धावा केल्या. विजय मांजरेकरांच्या अप्रतिम शतकाच्या जोरावर ही धावसंख्या उभी राहिली. मांजरेकरांनी 133 तर कर्णधार हजारेंनी 89 धावा कुटल्या. त्यांच्याशिवाय कोणत्याच फलंदाजाने साधा 20 धावांचा आकडा ही पार करता आला नाही. त्यानंतर इंग्लंडच्या संघाला 334 धावांवर भारतीयांनी ऑलआऊट केला. गुलाम अहमद यांनी पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे इंग्लंड केवळ 41 धावांनी पुढे होती.

एका मागोमाग एक फलंदाज ढासळले

दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आली भारतीय संघाचे फलंदाज एक एक करुन पॅव्हेलियनमध्ये परतण्यासाठीच मैदानावर येत होते. सलामीला आलेले पंकज रॉय आणि दत्‍ता गायकवाड खाते न खोलताच बाद झाले. एलेक बेडसरने गायकवाड यांची आणि ट्रूमॅन याने रॉय यांची विकेट घेत भारताची शून्यावर दोन बाद अशी अवस्था केली. ज्यानंतर एमके मंत्री आणि विजय मांजरेकरही एका पाठोपाठ एक बाद झाले. ट्रूमॅनने दोघांची विकेट घेत भारताला आणखी दोन झटके दिले. अशातऱ्हेने भारतीय संघ शून्यावर 4 बाद अशा स्थितीत पोहोचला आणि भारताचा पराभव जणू पक्का झाला.

विजय हजारेंची एकाकी झुंज

कर्णधार विजय हजारेंनी दुसऱ्या डावातही अर्धशतक करत 56 धावा केल्या. तर दत्‍तू फड़कर यांनी त्यांना साध देत 64 धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने 165 धावा केल्याने इंग्लंडला 125 धावांचे लक्ष्‍य मिळाले. जे इंग्लंडने केवळ तीन विकेट्सच्या बदल्यात मिळवत सामना आपल्या नावे केला. सामन्यात पदार्पण करणाऱ्या ट्रूमॅनने मिळवलेल्या एकामागोमाग एक विकेट्सवरच भारताला पराभव पत्करावा लागला.

हे ही वाचा :

कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या सात वर्षानंतरही इंग्लंडमधील धोनीचा रेकॉर्ड जसाच्या तसा!

WTC फायनलचं मैदान कोण मारणार, भारत की न्यूझीलंड?, ब्रेट ली म्हणतो…

WTC Final पूर्वी टीम इंडियावर निर्बंध, साऊथहॅम्प्टनमध्ये खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव

(India Lost badly against England in First Test at England Tour)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.