भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला (WTC Final) 18 जूनपासून सुरुवात होणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा सामना असून पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये इतकी मोठी टूर्नामेंट खेळवली गेली आहे. या सामन्यात विजयासह भारत WTC ची ट्रॉफीतर मिळवलेच, पण सोबत न्यूझीलंड विरुद्धचा आयसीसीच्या (ICC)मोठ्या स्पर्धांमध्ये पराभूत होण्याचा खराब रेकॉर्डही मोडू शकेल. कारण मागील 20 वर्षांत भारत 7 वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडशी भिडला असूनकेवळ एकदाच विजय मिळवू शकला आहे. (India Never Won in Big ICC Matches Against New Zealand From Last 20 Years Will WOn in WTC Final)