Rahul Dravid: हेड कोच राहुल द्रविड यांचा पत्ता कट होणार?

राहुल द्रविड यांच्याबाबतीत बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Rahul Dravid: हेड कोच राहुल द्रविड यांचा पत्ता कट होणार?
rahul-DravidImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 2:49 PM

मुंबई: T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवाला भारतीय क्रिकेट बोर्डाने गांभीर्याने घेतलं आहे. बीसीसीआयने सर्वात आधी निवड समितीला हटवून नवीन अर्ज मागवले. T20 फॉर्मेटसाठी कॅप्टनशिपमध्येही बदल होणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या जागी टी 20 ची धुरा हार्दिक पंड्याच्या हाती सोपवली जाऊ शकते. टी 20 फॉर्मेटसाठी हार्दिक पंड्याला कायस्वरुपी कॅप्टन बनवण्याचा निर्णय बीसीसीआयकडून लवकर जाहीर होऊ शकतो. नवीन निवड समिती अस्तित्वात आल्यानंतर हा निर्णय होईल.

बीसीसीआयमध्ये सुरु आहे विचारमंथन

सिलेक्शन कमिटी, रोहित शर्माच यांच्याबाबतीतच नाही, तर बीसीसीआय हेड कोच राहुल द्रविड यांच्याबद्दलही मोठा निर्णय घेऊ शकते. टी 20 क्रिकेटसाठी नवीन कोच नियुक्त करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. जानेवारीपर्यंत या बद्दल निर्णय होऊ शकतो. बीसीसीआयच्या मुंबई मुख्यालयातून ही माहिती समोर आलीय. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

टीम इंडियाची पुढची सीरीज कधी?

टीम इंडिया जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध टी 20 सीरीज खेळणार आहे. नवीन कॅप्टन आणि नवीन कोचच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया ही सीरीज खेळू शकते. श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजआधी हार्दिक पंड्याची टी 20 च्या कर्णधारपदी अधिकृत नियुक्ती जाहीर होईल. टी 20 टीमसाठी नवीन कोच नियुक्त करण्याचाही बोर्डाचा विचार आहे.

बोर्डाच्या पदाधिकाऱ्याने काय सांगितलं?

राहुल द्रविड फक्त वनडे आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करतील. नव्या कोचकडे टी 20 ची जबाबदारी असेल. “आम्ही याबद्दल गांभीर्याने विचार करतोय. राहुल द्रविड किंवा कुणाच्या क्षमतेचा हा विषय नाही. व्यस्त वेळापत्रकाची हाताळणी आणि विशेष कौशल्य असलेल्या कोचचा आम्ही विचार करतोय. टी 20 हा जणू आता एक वेगळा खेळ बनला आहे, ज्यात सतत मॅचेस होत असतात. हा बदल आपण आत्मसात केला पाहिजे. टी 20 साठी इंडियाचा नवीन कोचिंग सेटअप असेल” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

कोणाची नियुक्ती करणार?

T20 च्या कोचपदी कोणाची नियुक्ती करणार? या प्रश्नावर, आम्ही अजून कुठल्या नावाचा असा विचार केलेला नाही, असं उत्तर मिळालं. टी 20 क्रिकेटसाठी स्वतंत्र दृष्टीकोन हवा. जानेवारी आधी नव्या कॅप्टनची घोषणा होईल. नवीन कोचही असेल. पण कधी? ते आताच सांगता येणार नाही. असं या पदाधिकाऱ्याने सांगितलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.