‘हरण्याची भीती वाटते, म्हणून टीम इंडिया पाकिस्तानात येत नाही’, दिग्गज खेळाडूच विधान

Asia cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय आशिया कप संदर्भात मध्यममार्ग शोधण्याचा प्रयत्न करतायत. या टुर्नामेंटमध्ये भारताचे काही सामने दुसऱ्या देशात खेळवण्याचा विचार सुरु आहे.

'हरण्याची भीती वाटते, म्हणून टीम इंडिया पाकिस्तानात येत नाही', दिग्गज खेळाडूच विधान
Team india
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 9:51 AM

Asia cup 2023 : आयसीसीने पाकिस्तानला आशिया कप 2023 च यजमानपद दिलय, तेव्हापासून भारतीय टीम पाकिस्तानात जाणार का? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. बीसीसीआयने आतापर्यंत अनेकदा या बद्दलची आपली भूमिका स्पष्ट केलीय. बीसीसीआयने अनेकदा आपले इरादे जाहीर केले आहेत. कुठल्याही परिस्थितीत आपली टीम पाकिस्तानात पाठवणार नाही, हे बीसीसीआयने सांगितलय.

पाकिस्तानचे माजी खेळाडू इम्रान नाजिर यांच्या मते, भारताला पाकिस्तानात हरण्याची भीती वाटते, म्हणून टीम इंडिया पाकिस्तानात येण्यास तयार नाहीय.

बीसीसीआयला मुख्य चिंता काय?

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय आशिया कप संदर्भात मध्यममार्ग शोधण्याचा प्रयत्न करतायत. या टुर्नामेंटमध्ये भारताचे काही सामने दुसऱ्या देशात खेळवण्याचा विचार सुरु आहे. बीसीसीआयला खेळाडूंच्या सुरक्षेची चिंता आहे. त्यामुळे बीसीसीआयला पाकिस्तानात आपली टीम पाठवायची नाहीय.

राजकारण करता, तेव्हा मार्ग नसतो

“भारतीय टीम पाकिस्तानात न येण्यासाठी फक्त कारण देतेय. सुरक्षा हा मुद्दा नाहीय. बरेच संघ पाकिस्तानात येऊन गेलेत. ऑस्ट्रेलियन टीम सुद्धा पाकिस्तानात येऊन गेली. ही सर्व फक्त कारणं आहेत. टीम इंडियाला पाकिस्तानात पराभवाची भीती वाटते, हेच त्यांच्या न येण्यामागे मुख्य कारण आहे. कारण द्यायची सोडून, भारताने इथे येऊन खेळलं पाहिजे. जेव्हा तुम्ही राजकारण सुरु करता, तेव्हा त्यावर कुठला मार्ग नसतो” असं इमरान नाजिर नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये म्हणाले. फक्त ICC टुर्नामेंटमध्ये आमने-सामने

भारत आणि पाकिस्तानची टीम परस्परांबरोबर द्विपक्षीय मालिका खेळत नाहीय. त्याशिवाय भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. दोन्ही टीम्स आतापर्यंत फक्त आयसीसी टुर्नामेंटमध्ये आमने-सामने आले आहेत. यात टी 20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप, आशिया कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या स्पर्धा आहेत. भारतीय टीमने 2006 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी टेस्ट सीरीजमध्ये पराभव झालेला पण वनडे सीरीज जिंकली होती. 2008 साली पाकिस्तानात गेलेल्या श्रीलंकन टीमवर दहशतवादी हल्ला झाला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.