IND vs ENG Playing 11, 1st ODI: पहिली वनडे जिंकण्यासाठी Rohit Sharma कुठले खेळाडू निवडणार, जाणून घ्या….
IND vs ENG Playing 11, 1st ODI: भारताने इंग्लंड (IND vs ENG) विरुद्धची टी 20 सीरीज जिंकली. ही मालिका भारताने 2-1 अशी जिंकली. आता वनडे सीरीज (ODI Series) जिंकण्याचा इरादा आहे.
मुंबई: भारताने इंग्लंड (IND vs ENG) विरुद्धची टी 20 सीरीज जिंकली. ही मालिका भारताने 2-1 अशी जिंकली. आता वनडे सीरीज (ODI Series) जिंकण्याचा इरादा आहे. पहिला सामना ओव्हलच्या मैदानावर खेळला जाणार आहे. पुन्हा एकदा दमदार प्रदर्शन करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. भारताचं सर्व लक्ष सध्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप वर आहे. पण भारतासाठी इंग्लंड विरुद्धची ही वनडे सीरीजही तितकीच महत्त्वाची आहे. इंग्लंडला त्यांच्याच घरात नमवून विजयी लय कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. पहिली वनडे जिंकण्यासाठी रोहित शर्मा कुठल्या खेळाडूंना संधी देणार? हा आता खरा प्रश्न आहे.
शिखर धवनवर विशेष नजर
वनडे फॉर्मेट मध्ये भारताची सलामीची जोडी बदलणार हे निश्चित आहे. रोहित शर्मा सोबत शिखर धवन सलामीला येईल. फेब्रुवारीनंतर शिखर धवन आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. शिखर धवनला आता फक्त वनडे सीरीज मध्ये संधी मिळते. त्यामुळे तो इतक्या महिन्यानंतर टीम इंडियाच्या जर्सीत खेळताना दिसेल. वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजसाठी सुद्धा तो कॅप्टन आहे. त्यामुळे त्याच्यावर नजर असेल.
सूर्यकुमार यादवकडून भरपूर अपेक्षा
विराट कोहली कशी कामगिरी करतो, याकडेही लक्ष असेल. कारण विराट कोहली सातत्याने खराब फॉर्मचा सामना करतोय. नुकत्याच संपलेल्या टी 20 मालिकेतही त्याला प्रभाव पाडता आला नाही. सूर्यकुमार यादवकडून भरपूर अपेक्षा असतील. काल शेवटच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादव कमालीचा खेळला. त्याने 55 चेंडूत 117 धावा फटकावल्या. त्याच्यामुळे भारतीय संघाच्या विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या.
रोहित शर्मा काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्ड कप लक्षात घेता, रोहित शर्माने व्हाइट बॉल मध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. आमच्यासाठी सर्वच सामने महत्त्वाचे आहेत, असं रोहितने म्हटलं आहे. वनडे प्राथमिकता नाही, असा विचार करुन आम्ही क्रिकेट खेळणार नाही. आम्ही काही बदल करु, पण आमचं लक्ष्य विजय आहे, असं रोहित म्हणाला.
अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा/शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल